AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar Death: मृतदेह जळाले, पण कागदपत्रं जळली नाहीत, कसं काय? दादांच्या मृत्यूवर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याकडून प्रश्नचिन्ह उपस्थित

Ajit Pawar Death: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारणात हलचाली वाढल्या आहेत, तर दुसरीकडे दादांच्या मृत्यूवर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.

Ajit Pawar Death:  मृतदेह जळाले, पण  कागदपत्रं जळली नाहीत, कसं काय? दादांच्या मृत्यूवर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याकडून प्रश्नचिन्ह उपस्थित
अजित पवार
| Updated on: Feb 02, 2026 | 11:12 AM
Share

Ajit Pawar Death: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक चढ – उतार पाहायला मिळत आहेत. राज्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात अकस्मित निधन झालं आणि राज्याच्या राजकारणावर मोठं संकट आलं. सांगायचं झालं तर, बारामती येथे सभेसाठी जात असताना अजित दादा यांच्या विमानाचं लँडिंग होण्यापूर्वीच स्फोट झाला. अशा परिस्थितीत प्रश्नोत्तरांच्या राजकारणानंतर आता आरोप-प्रत्यारोपांचे राजकारणही सुरू होताना दिसत आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि अजित पवारांचे जवळचे मानले जाणारे अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलं आहे. सर्वात आधी मिटकरी यांनी अपघातावर चिंता व्यक्त केली आणि त्यानंतर सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली… मिटकरी म्हणाले, ‘महाराष्ट्रातील एक प्रमुख नेते अजित दादा आता आपल्यात नाहीत. अलिकडेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि ते प्रचारासाठी बारामतीला येत होते.”

मिटकरी यांनी उपस्थित केले प्रश्नचिन्ह

अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यभरात शोककळा पसरली आहे. तर दुसरीकडे अमोर मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. अजितदादांच्या प्रवासाच्या शेवटच्या क्षणी अचानक मार्ग बदलला. पायलटलाही अचानक बदलण्यात आले. मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केला की, कागदाचा एकही तुकडा जळाला नाही, पण मृतदेह जळाले. यामुळे काही प्रश्न निर्माण होतात आणि काही शंका निर्माण होतात.

मिटकरी पुढे म्हणाले, ‘मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे…आणि चौकशी होणार असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.’ एवढंच नाही तर, स्वतः केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेवून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुनिश्चित केली जावी.. असं देखील आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

अजित पवार यांचं निधन… राज्यभरात शोककळा…

बुधवारी म्हणजे 28 जानेवारी 2025 सकाळी 8.30 वाजता अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं… अशी बातमी समोर आली आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला. तर पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला… या दुर्दैवी अपघातात कॅप्टन सुमित कपूर, को-कॅप्टन शंभवी पाठक, सुरक्षा अधिकारी विदिप जाधव आणि फ्लाइट अटेंडेंट पिंकी माळी यांचं देखील निधन झालं आहे.

Follow Us
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
Nanded | दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार