AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं की...; पंकजा मुंडेंनंतर आता धनंजय मुंडेंचंही मोठं विधान

माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं की…; पंकजा मुंडेंनंतर आता धनंजय मुंडेंचंही मोठं विधान

| Updated on: Aug 03, 2026 | 4:58 PM
Share

राज्यातील राजकारणात सध्या निवृत्तीच्या वक्तव्यांची चर्चा रंगली असतानाच अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीही राजकीय निवृत्तीबाबत सूचक विधान केले आहे. सध्याच्या राजकीय वातावरणावर भाष्य करताना त्यांनी, "खरंच आता राजकारणात राहावं की न राहावं, असा प्रश्न पडतो," असे वक्तव्य केले.

राज्यातील राजकारणात सध्या निवृत्तीच्या वक्तव्यांची चर्चा रंगली असतानाच अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीही राजकीय निवृत्तीबाबत सूचक विधान केले आहे. सध्याच्या राजकीय वातावरणावर भाष्य करताना त्यांनी, “खरंच आता राजकारणात राहावं की न राहावं, असा प्रश्न पडतो,” असे वक्तव्य केले.

एका कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे यांनी राज्यातील सध्याच्या राजकारणाबद्दल नाराजी व्यक्त केली. “आज सर्वत्र जाती-पाती आणि धर्माच्या आधारावर राजकारण होत आहे. अशा वातावरणात माझ्यासारख्या व्यक्तीला खरंच राजकारणात राहावं की नाही, असा विचार मनात येतो,” असे ते म्हणाले.

मात्र, त्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सामाजिक समतेसाठी काम सुरूच ठेवणार असल्याचे संकेत दिले. “महापुरुषांनी दिलेले समतेचे विचार आमच्या पाठीशी आहेत. समाजात पुन्हा समता प्रस्थापित करण्यासाठी काम करणे हीच आमची जबाबदारी आहे,” असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनीही “मला राजकारणातून संन्यास घ्यावासा वाटतो,” असे विधान केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटल्या असून, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांना भाजप सोडून काँग्रेसमध्ये येण्याची आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचे नेतृत्व करण्याची खुली ऑफर दिली होती.

पंकजा मुंडे यांच्या विधानानंतर आता धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून, मुंडे बंधू-भगिनींच्या सलग वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

Published on: Aug 03, 2026 04:58 PM

Follow Us