
टीम इंडियाच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहाँ ही कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते. हसीन जहाँ हीने शमीवर अनेक आरोप केले. दोघांचा अधिकृतरित्या घटस्फोट झालेला नाही. मात्र दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र राहत नाहीत. एका बाजूला मोहम्मद शमी याचं अनेक महिन्यांनंतर भारतीय संघात कमबॅक झालं आहे. शमीची इंग्लंडविरुद्धच्या टी 20i आणि वनडे सीरिजसाठी निवड करण्यात आली आहे. तसेच शमी चॅम्पियन्स ट्रॉफीतही खेळणार आहे. क्रिकेट चाहत्यांना एका बाजूला शमीला मैदानात पाहण्याची उत्सूकता आहे. तर दुसऱ्या बाजूला हसीन जहाँ हीने एक सोशल मीडिया पोस्ट करत साऱ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे.
हसीन जहाँ हीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. हसीनने या पोस्टद्वारे स्वधर्मावर हल्लाबोल केला आहे. हसीनने इस्लाम धर्मातील प्रथेविरुद्ध ही पोस्ट केली आहे. हसीनला या पोस्टमुळे ट्रोल करण्यात येत आहे. हसीनने आपल्या धर्मावर नक्की का आणि कोणत्या मुद्द्यावरुन टीका केलीय? जाणून घेऊयात.
हसीनने सोमवारी इंस्टाग्रामवर एक व्हीडिओ पोस्ट केलाय. हसीनने इस्लाम धर्मातील ‘हलाला’ या प्रथेबाबतचा व्हीडिओ पोस्ट केला आहे. या व्हीडिओत एक मुलगी रडतरडत एका पानावर स्वाक्षरी करत आहे. या मुलीचा स्वाक्षरी करताना हात थरथरताना दिसतोय. तसेच त्या मुलीच्या मर्जीविरोधात हे केलं जातंय,असं जाणवतंय.
मीडिया रिपोर्टनुसार, हलाला एक प्रक्रिया आहे त्यानुसार महिला दुसऱ्या पुरुषासह लग्न करते आणि त्यालाच घटस्फोट देते. त्यानंतर ती महिला तिच्या पहिल्या नवऱ्यासह पुन्हा एकदा लग्न करते. हलालाला निकाह असंही म्हटलं जातं. सुन्नी मुस्लिमांमध्ये हा प्रकार केला जातो.
“दीन को वहां फॉलो करो जहां इंसानियत बची हो, जहां इंसानियत का खून हो, वहां दीन धर्म को क्या फॉलो करना। जिंदगी इत्मीनान से जीने का नाम है, खौफजदा जिंदगी ही जहन्नुम है, और कोई दीन या धर्म जिंदगी को जहन्नुम की तरफ ढकेलने की बात नहीं करता। ‘बेवकूफ लोग सारे’।”, असं हसीनने तिच्या इंस्टा पोस्टमध्ये म्हटलंय.