AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हटके अंदाज, विचित्र बोलिंग डेंजर रनअप, आकाश चोप्राकडून व्हिडीओ शेअर

टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्राने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

हटके अंदाज, विचित्र बोलिंग डेंजर रनअप, आकाश चोप्राकडून व्हिडीओ शेअर
| Updated on: Dec 23, 2020 | 2:32 PM
Share

मुंबई : प्रत्येकाची बोलिंग अ‌ॅक्शन ही वेगळी असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक गोलंदाज हे आपल्या बोलिंग अ‌ॅक्शनमुळे चर्चेत असतात. यामध्ये श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाचा उल्लेख करता येईल. पण ही गोष्ट झाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटची. आपला भारत देश हा क्रिकेटवेडा आहे. प्रत्येक भागात क्रिकेट खेळलं जातं. हल्ली टेनिस क्रिकेटमुळे स्थानिक पातळीवरील खेळाडूंना प्रसिद्धी मिळतेय. टीम इंडियाचा माजी खेळाडू आकाश चोप्रा सोशल मीडियावर व्हायरल होणारे क्रिकेटचे भन्नाट व्हिडिओ आपल्या आवाजसह शेअर करतो.आकाशने असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. (team india former player aakash chopra share unique bowling action viral video)

या व्हिडीओतील तरुणाची बॉलिंग एक्शन पाहून हा नक्की बोलिंग करतोय की आणखी काही असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओत हा तरुण रनअपसह विचित्र अ‌ॅक्शनसह गोलंदाजी करताना दिसतोय. विशेष म्हणजे हा तरुण उड्या मारताना दिसतो. त्यामुळे हा पडतो की काय असंच सर्वांना वाटतंय.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या फार चर्चेत आहे. आकाश चोप्राने आपल्या आवाजाने या व्हिडीओत जीव ओतला आहे. “बोलिंग टाकतोय की कोणाला घाबरवतोय. सांभाळ-सांभाळ पडशील”, असा आवाज आकाश चोप्राने या व्हिडीओ दिला आहे. यामुळे हा व्हिडीओ पाहण्यास आणखी मजा येत आहे.

“ही काय अ‌ॅक्शन आहे”, अशा कॅप्शनसह आकाश चोप्राने हा व्हिडीओ शेअर केला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओला चांगलीच पसंती दिली आहे. तसेच नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. आकाश चोप्रा आपल्या ट्विटर आणि फेसबुकवरुन असे क्रिकेटचे सुंदर, भन्नाट आणि अतरंगी व्हिडीओ आपल्या आवाजसह शेअर करत असतो.

दरम्यान टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबरला खेळण्यात येणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळण्यात येणार आहे. हा सामना बॉक्सिंग डे कसोटी असणार आहे.

संबंधित बातम्या : 

Aus vs Ind | AUS v IND | ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, बॉक्सिंग डे कसोटीतून हे 2 खेळाडू बाहेर

PHOTO | फिरकीचा राजा-युट्यूबची राणी, युजवेंद्र-धनश्री विवाहबद्ध

(team india former player aakash chopra share unique bowling action viral video)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.