टीम इंडियाने झिम्बाब्वेला दिली क्लीन स्वीप, तिसऱ्या वनडेतही 13 रन्सनी मात, पाकिस्तानच्या रेकॉर्डची बरोबरी

सीरिजमध्ये 3-0 अशी मात करत टीम इंडियाने पाकिस्तानच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. पाकिस्तानने झिम्बाब्वेच्या विरोधात 62 मॅचेस खेळल्या आहेत, त्यात 54 मॅचेस पाकिस्तान जिंकली आहे. या विजयामुळे टम इंडियानेही 54 मॅचेस जिंकल्याच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

टीम इंडियाने झिम्बाब्वेला दिली क्लीन स्वीप, तिसऱ्या वनडेतही 13 रन्सनी मात, पाकिस्तानच्या रेकॉर्डची बरोबरी
भारताचा गोलंदाजी करण्याचा निर्णय, पांड्याच्या या खेळाडूला संधी
Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Aug 22, 2022 | 9:43 PM

हरारे – टीम इंडियाने (team India)झिम्बाब्वेविरोधातील (Zimbabwe)तिसरी वन डे ही 13 रन्सने जिंकली आहे. या विजयामुळे के एल राहुल याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाने 3-0 अशी मात झिम्बाब्वेला दिली आहे. शेवटच्या वनडेत पहिल्यांदा बॅटिंग करताना टीम इंडियाने 50ओव्हर्समध्ये 289 रन्स केले होते. प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वेच्या टीमने 49.3ओव्हर्समध्ये 276 रन्स करत टीम ऑल आऊट झाली. झिम्बाब्वेकडून सिकंदर रजाने शानजार बॅटिंग केली. त्याने 95 बॉल्समध्ये 115 रन्स केले. एक वेळ अशी आली होती की मॅचमध्ये टीम इंडियाचा विजय होईल, याची खात्री वाटत नव्हती. मात्र शार्दुल ठाकूरच्या बॉलवर शुभमन गीलने (Shubhman Gill)शानदार कॅच पकडत सिकंदरची इनिंग संपवली. आवेश खानने 3 विकेट्स घेतल्या. दीपक चहर, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी 2-2 विकेट्स घेतल्या.

शुभमनची चांगली बॅटिंग

टीम इंडियाच्या बॅटिंगमध्ये सर्वाधिक रन्स या शुभमनने केल्या. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय करियरची पहिली सेंच्युरी केली. पंजाबच्या या बॅट्समनने 97 बॉल्समध्ये 130 रन्स केले. तर ईशान किशनने आपल्या वनडे करिअरमधील दुसरी फिफ्टी पूर्ण केली. ब्रँड एवंसने शानदार बॉलिंग करत झिम्बाब्वेसाठी पाच विकेट्स पटकावल्या.

झिम्बाब्वेविरोधात सर्वाधिक मॅच जिंकण्याच्या रेकॉर्डची बरोबरी