
मुंबई | टीम इंडिया काही दिवसांनी वेस्टइंडिज दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात विंडिज विरुद्ध अनुक्रमे टेस्ट, एकदिवसीय आण टी 20 मालिका खेळणार आहे. या विंडिज दौऱ्याची सुरुवात ही 12 जुलैपासून कसोटी मालिकेने होणार आहे. या दौऱ्यात 2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी 20 सामने खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत खेळणार आहे. या आशिया कप स्पर्धेच्या महत्वाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यासह टीम इंडियााठीही महत्वाची बातमी समोर आली आहे.
टीम इंडियाचे 2 स्टार खेळाडू हे कमबॅकच्या तयारीला लागले आहेत. या दोन्ही खेळाडूंना दुखापतीमुळे गेल्या अनेक मालिकांना मुकावं लागलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह आण श्रेयस अय्यर हे दोघे कमबॅकसाठी सज्ज झाले आहेत. या दोघांचे आशिया कप स्पर्धेपर्यंत कमबॅक करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं म्हटलं जात आहे.
जसप्रीत बुमराह हा दुखापतीमुळे टीम इंडियातून गेल्या अनेक महिन्यांपासून बाहेर आहे. बुमराह बाहेर असल्याने टीम इंडियाचं मोठं नुकसान झालंय. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये बुमराहची उणीव भासली. तसेच श्रेयस अय्यर हा देखील गेल्या 3-4 महिन्यांपासून दुखापतीमुळे त्रासलेला आहे. आता हे दोघे दुखापतीतून सावरावेत आणि आशिया कप स्पर्धेपर्यंत टीम इंडियात परतावेत, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना आहे.
बुमराह आणि श्रेयस अय्यर सज्ज
Both Jasprit Bumrah and Shreyas Iyer are recovering from their respective back surgeries and could be available for the Asia Cup after missing the IPL and WTC Final pic.twitter.com/cJDEgdS0U8
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 15, 2023
आशिया कप स्पर्धा ही यंदा 50 षटकांची असणार आहे. या स्पर्धेतील सहभागी एकूण 6 संघांना 2 गटात विभागण्यात आलंय. त्यानुसार ए ग्रुपमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान आणि नेपाळ हे 3 संघ आहेत. तर श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या 3 टीम आहेत. दोन्ही ग्रुपमधून एकूण 4 संघ सुपर 4 साठी पात्र ठरतील. यंदा नेपाळचा क्रिकेट संघ इतिहास रचून 2023 च्या आशिया कपसाठी पात्र ठरला आहे.
दरम्यान एसीसीने आशिया कप स्पर्धेचं मुख्य तारखा जाहीरे केल्यात. मात्र सामनेनिहाय वेळापत्रक जाहीर केलेलं नाही. आता क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे स्पर्धेतील सामन्यांच्या वेळापत्रकाकडे लागून राहिलंय. त्यातही टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या कट्टर आणि चीर प्रतिद्वंदी संघामध्ये कधी आणि कुठे सामना आयोजित केला जाणार, याकडे क्रिकेट विश्वाचं बारीक लक्ष असणार आहे.