AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India Coach & Chief Selector | नवीन हेड कोच, चीफ सिलेक्टरच्या नावाची ‘या’ दिवशी होणार घोषणा

Team India Coach & Chief Selector | भारतीय क्रिकेटमध्ये सध्या बदलाचा काळ सुरु आहे. भविष्याच्या दृष्टीने काही महत्वाचे निर्णय होऊ शकतात. लवकरच टीम इंडियाचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे.

Team India Coach & Chief Selector |  नवीन हेड कोच, चीफ सिलेक्टरच्या नावाची 'या' दिवशी होणार घोषणा
Team IndiaImage Credit source: BCCI
| Updated on: Jul 04, 2023 | 11:54 AM
Share

मुंबई : भारतीय पुरुष क्रिकेट टीम वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. तेच महिला क्रिकेट टीम बांग्लादेश दौऱ्यावर रवाना होणार आहे. दोन्ही टीम परदेश दौऱ्यावर असताना टीम इंडियाच्या हेड कोच आणि चीफ सिलेक्टर संदर्भात एक महत्वाची बातमी आहे. भारतीय महिला क्रिकेट टीमचे हेड कोच आणि भारतीय पुरुष क्रिकेट टीमच्या चीफ सिलेक्टरच्या नावाची घोषणा एकत्र होऊ शकते. सध्या ऑनलाइन आणि ऑफ लाइन दोन्हीसाठी इंटरव्यू सुरु आहेत.

BCCI ची क्रिकेट सल्लागार समिती या दोन्ही महत्वाच्या पदांसाठी इंटरव्यू घेत आहे. 3 जुलैच्या मुलाखतीमधून काही निष्कर्ष निघाला नव्हता. 4 जुलैला सुद्धा इंटरव्यू सुरु राहतील, इंटरव्यूनंतर CAC आज 4 जुलैलाच नवीन नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

कोचसाठी तिघांचा इटरव्यू

BCCI च्या क्रिकेट सल्लागार समितीने भारतीय महिला क्रिकेट टीमच्या हेड कोच पदासाठी तीन नाव शॉर्टलिस्ट केली होती. यात भारतीय महिला क्रिकेट टीमला 2017 साली वनडे वर्ल्ड कपच्या फायनलपर्यंत घेऊन जाणारे तुषार अरोठे आहेत. दुसरे अमोल मजुमदार आणि तिसरे इंग्लंडचे जॉन लुईस आहेत. अमोल मजुमदार मुंबईचे माजी कोच आहेत. त्याशिवाय देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे.

कोणाचा इंटरव्यू ऑफलाइन

CAC च्या 3 सदस्यीय समितीमध्ये सुलक्षणा नाइक, अशोक मल्होत्रा आणि जतीन परांजपे यांचा समावेश आहे. त्यांनी सर्वाचे इंटरव्यू घेतले. अमोल मजूमदार महिला टीमचे हेड कोच बनण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. मजूमदार यांचा इंटरव्यू ऑफलाइन झाला. अन्य दोघांचे इंटरव्यू ऑनलाइन झाले. कोणाचं नाव आघाडीवर?

क्रिकबजच्या रिपोर्ट्नुसार महिला क्रिकेट टीमचा हेड कोच आणि पुरुष क्रिकेट टीमच्या हेड कोचच्या नावाची घोषणा एकत्र होऊ शकते. चेतन शर्मा यांना हटवल्यापासून भारतीय पुरुष क्रिकेट टीमच चीफ सिलेक्टर पद रिक्त आहे. अजित आगरकर या शर्यतीत आघाडीवर आहेत.

Follow Us
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच.... कुटुंबीय भावूक, डोळे पाणावले
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच.... कुटुंबीय भावूक, डोळे पाणावले; म्हणाले...
सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पाचे
सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पाचे दर्शन
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप