वर्ल्ड कपमध्ये झालेल्या पराभवानंतर के. एल. राहुलने निवृत्तीबाबत केलेल्या वक्तव्याने चाहते हादरले

| Updated on: Dec 31, 2023 | 8:10 PM

वर्ल्ड कपमध्ये राहुलने ऑस्ट्रेलियालविरूद्धच्या सामन्यात केलेली जिगरबाज खेळी सर्वांनी पाहिली. के.एल. राहुलने आता तिन्ही फॉरमॅटमध्ये  फॉर्ममध्ये पाहायला मिळाला. मात्र के. एल. राहुल याने निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

वर्ल्ड कपमध्ये झालेल्या पराभवानंतर के. एल. राहुलने निवृत्तीबाबत केलेल्या वक्तव्याने चाहते हादरले
Follow us on

मुंबई : टीम इंडियाचा स्टार खेळाडू के. एल. राहुल याने दमदार पदार्पण केलं आहे. यंदाच्या वर्षाच्या सुरूवातील त्याने काही खास प्रदर्शन केलं नव्हतं. त्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका होत होती. के.एल. राहुल याला आयपीएलमध्ये दुखापत झाली आणि तो बाहेर पडला होता. आशिया कपमध्येही त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. वर्ल्ड कपमध्ये राहुलने ऑस्ट्रेलियालविरूद्धच्या सामन्यात केलेली जिगरबाज खेळी सर्वांनी पाहिली. के.एल. राहुल आता तिन्ही फॉरमॅटमध्ये फॉर्ममध्ये असलेला पाहायला मिळत आहे. आता झालेल्या कसोटी सामन्यातही आफ्रिकेविरूद्ध गड्याने शतक ठोकलं. अशातच के.एल. ने निवृत्तीबाबत केलेल्या वक्तव्याने चर्चेत आला आहे.

काय म्हणाला के.एल. राहुल ?

2019 साली वर्ल्ड कपमध्ये झालेला पराभव कधीच विसरू शकत नाही. सेमी फायनलमध्ये न्यूझीलंड संघाने पराभूत करत टीम इंडियाला बाहेर केलं होतं. कोणत्याही खेळाडू स्वप्नातही विचार केला नव्हता की टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार नाही. साखळी फेरींमध्ये आम्ही दमदार विजय मिळवले होते. काही सामन्यांमध्ये खराब कामगिरी झाली होती पण सेमी फायनलमध्ये जागा मिळवली होती. धोनी आणि जडेजा मैदानात असताना काहीतरी चमत्कार होईल असं वाटत होतं पण तसं काही झालं नाही, असं के. एल. राहुल याने म्हटलं आहे.

प्रत्येकाला वाटत होतं की काहीतरी चमत्कार होईल, जेव्हा पराभव झाला तेव्हा ड्रेसिंग रूममधील सगळे निराश झाले होते. मला आजही तो दिवस आठवतो कारण मी असं कोणालाच रडताना पाहिलं नव्हतं. आमच्यासाठी हा एक मोठा धडा होता. वर्षभर तुम्ही कितीही चांगले खेळा पण जेव्हा तुम्ही निवृत्ती घेता त्यावेळी वर्ल्ड कपमधील कामगिरीवर तुम्हाला लक्षात ठेवलं जात असल्याचं राहुल म्हणाला.

दरम्यान, यंदाही टीम इंडियाच्या पदरी निराशा पडली. ऑस्ट्रेलिया संघाने टीम इंडियाला फायनलमध्ये पराभूत करत परत एकद वर्ल्ड कपव नाव कोरलं. टीम इंडियासाठी आता टी-20 वर्ल्ड कपमध्ये चांगल्या कामगिरीची सर्व भारतीयांना अपेक्षा आहेत.