‘एकाच जागेवर बसून असते कारण…’, के. एल. राहुल पत्नी अथिया शेट्टी हिच्याबद्दल असं का म्हणाला?

KL Rahul : क्रिकेटपटू के. एल. राहुल याने पत्नी अथिया शेट्टी हिच्याबद्दल केला मोठा खुलासा..., अथिया हिच्याबद्दल राहुल असं का म्हणाल? सध्या सर्वत्र राहुल याच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे... अथिया शेट्टी अभिनेते सुनील शेट्टी यांची मुलगी आहे.

'एकाच जागेवर बसून असते कारण...', के. एल. राहुल पत्नी अथिया शेट्टी हिच्याबद्दल असं का म्हणाला?
Follow us
| Updated on: Dec 31, 2023 | 1:13 PM

मुंबई | 31 डिसेंबर 2023 : अभिनेते सुनील शेट्टी यांची लेक आणि अभिनेत्री अथिया शेट्टी हिन जानेवारी 2023 मध्ये भारतीय क्रिकेटपटू के. एल. राहुल (KL Rahul) याच्यासोबत लग्न केलं. लग्नाआधी अनेक वर्ष राहुल आणि अथिया एकमेकांना डेट करत होते. लग्नाआधी दोघांना अनेक ठिकाणा स्पॉट देखील करण्यात आलं. अनेक वर्ष एकत्र राहिल्यानंतर राहुल आणि अथिया यांनी लग्न कण्याचा निर्णय घेतला. जानेवारी मध्ये दोघांनी लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. लग्नानंतर राहुल याने पत्नी अथिया हिच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राहुल याच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

वर्ल्डकप सुरु असताना अथिया शेट्टी आपला सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये का आली नाही? यावर राहुल याने मोठा खुलासा केला आहे. क्रिकेटपटू के. एल. राहुल म्हणाला, ‘वर्ल्ड कप मॅचदरम्यान मी अथियाला स्टेडियममध्ये येण्यास सांगितलं होतं. पण ती थोडी अंधश्रद्धाळू असल्यामुळे घरीच राहून टीव्हीवर सामना पाहण्याचा तिने हट्ट धरला होता.’

पुढे राहुल म्हणाला, ‘घरात अथिया हिचा एक लकी स्पॉट आहे. त्या एकाच जागेवर बसून अथिया मॅच पाहाते. जो पर्यंत मी खेळत आहे, तोपर्यंत अथिया त्या जागेवरुन हटत नाही. मी जेव्हा मैदानावर क्रिकेट खेळत असतो, तेव्हा ती माझ्याबद्दल थोडी अंधश्रद्धाळू होते.’ सांगायचं झालं तर, अथिया तिच्या वडिलांसारखी आहे.

हे सुद्धा वाचा

सुनील शेट्टी यांनी सांगितलं होतं की, त्यांनी पूर्ण वर्ल्डकप जमीनीवर बसून पाहिला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुनील शेट्टी यांची मुलगी आणि जावयाची चर्चा रंगत आहे. खुद्द सुनील शेट्टी देखील त्यांच्या मुलांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयु्ष्याबद्दल चाहत्यांना सांगत असतात.

अथिया हिने ‘हिरो’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘हिरो’ सिनेमानंतर देखील अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. पण प्रेक्षकांनी अभिनेत्रीला आणि तिच्या सिनेमांना प्रेम दिलं नाही. अथिया हिचा एकही सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला नाही.

अथिया आता बॉलिवूडपासून दूर आहे. पण अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Non Stop LIVE Update
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?.
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?.
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट.
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक.
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका.
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी.
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका.
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?.
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत.
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात.