Rohit Sharma: रोहित टी20I निवृत्तीनंतर IPL मध्ये खेळणार नाही? हिटमॅन म्हणाला…

Rohit Sharma On Ipl: रोहित शर्माने टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकल्यानंतर टी20i क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर आता रोहितने आयपीएलमध्ये खेळण्याबाबत भाष्य केलंय.

Rohit Sharma: रोहित टी20I निवृत्तीनंतर IPL मध्ये खेळणार नाही? हिटमॅन म्हणाला...
rohit sharma press conference
| Updated on: Jun 30, 2024 | 7:33 PM

रोहित शर्माने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला 17 वर्षांनंतर टी 20 वर्ल्ड कप जिंकून दिला. भारतीय क्रिकेट संघाने सलग 8 वा सामना जिंकून अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी मात करत टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. टीम इंडियाने 177 धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 169 धावांवर रोखलं. रोहित शर्माने या विजयासह 2 रेकॉर्ड्स केले. रोहित टीम इंडियाकडून 2 वर्ल्ड कप जिंकणारा पहिला खेळाडू ठरला. तसेच रोहितच्या नेतृत्वातील टीम इंडियाचा हा 50 वा टी 20I विजय ठरला. टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजयानंतर साऱ्या भारतात जल्लोष सुरु होता. मात्र विराट कोहली आणि त्यानंतर कॅप्टन रोहित शर्मा याने टी20I क्रिकेटमधून निवृ्त्तीचा निर्णय घेत क्रिकेट चाहत्यांना धक्का दिला. त्यामुळे आता आपले 2 लाडके खेळाडू पुन्हा टी20I क्रिकेटमध्ये दिसणार नाही, ही खंत चाहत्यांनी व्यक्त केली. मात्र दोघांनी वर्ल्ड कप विजयासह निरोप घेतल्याचाही आनंद चाहत्यांना आहे.

रोहितने टी20I मधून निवृत्त झालो असलो तरी वनडे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये खेळत राहणार असल्याचं स्पष्ट केलंय. मात्र टी20I मधून निवृत्त झाल्याने रोहित आयपीएलमध्ये खेळणार की नाही? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. रोहित आयपीएलमध्ये खेळणार की नाही? या प्रश्नाचं उत्तर स्वत: हिटमॅननेच दिलं आहे. तसेच निवृत्ती घेण्याची इच्छा नव्हती, मात्र स्थितीमुळे तसा निर्णय घ्यावा लागल्याचं रोहितने नमूद केलं.

रोहित काय म्हणाला?

टी20I क्रिकेटमधून मी निवृत्त होईन, असा विचार केला नव्हता. पण स्थितीच अशी आली की तो निर्णय घ्यावा लागला. तसेच टी 20 वर्ल्ड कपसह अलविदा करणं यापेक्षा चांगला योग दुसरा नाही. तसेच 100 टक्के मी आयपीएलमध्ये खेळणार”, असं रोहितने नमूद केलं.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया आणि तबरेझ शम्सी.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह.