Rohit Sharma NetWorth : 7 कोटी पगार, 15 लाख मॅच फी, IPL मधून रग्गड पैसा, रोहित कमाईबाबतही ‘हिट’मॅन

Rohit Sharma Income and Property : टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा फक्त ऑन फिल्डच नाही तर ऑफ फिल्डही हिट आहे. रोहितने गेल्या अनेक वर्षात क्रिकेट आणि इतर माध्यमातून 200 पेक्षा अधिक कोटी कमावले आहेत. जाणून घ्या.

Rohit Sharma NetWorth : 7 कोटी पगार, 15 लाख मॅच फी, IPL मधून रग्गड पैसा, रोहित कमाईबाबतही हिटमॅन
Rohit Sharma Networth Car Collection
Image Credit source: TV9
| Updated on: May 08, 2025 | 2:25 PM

रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी घेतलेल्या निवृत्तीमुळे चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. रोहितने असा निर्णय घेतल्याने क्रिकेट चाहत्यांना आपल्या लाडक्या कर्णधाराला आणि खेळाडूला निरोप देण्याची संधीही मिळाली नाही. रोहितने कसोटी कारकीर्दीत एक फलंदाज आणि कर्णधार म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली. रोहितने भारताला 24 पैकी 12 सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला. तसेच रोहितने 12 वर्ष कसोटी क्रिकेटची सेवा केली. रोहितने या 12 वर्षांत 67 सामन्यांमधील 116 डावांत 12 शतकं, 18 अर्धशतकं आणि 1 द्विशतकासह एकूण 4 हजार 301 धावा केल्या. रोहितच्या निवृत्ती निमित्ताने त्याची कमाई किती आहे? हे जाणून घेऊयात.

रोहितच्या नेटवर्थचं ‘द्विशतक’

रोहितने आंतरराष्ट्रीय आणि लीग क्रिकेटमधून रग्गड कमाई केली आहे.तसेच रोहित जाहिरातींमधूनही खोऱ्याने पैसे कमावतो. रोहितकडे बीसीसीआयचं ए प्लस सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट आहे. रोहितला त्यानुसार वार्षिक 7 कोटी रुपये मिळतात. तसेच रोहितला प्रत्येक सामन्यासाठी मानधनही मिळतं. नियमांनुसार एका कसोटीसाठी 15, एकदिवसीय सामन्यासाठी 6 आणि टी 20 मॅचसाठी 3 लाख रुपये मानधन दिलं जातं. रोहित टी 20I नंतर कसोटी क्रिकेटमधून निवत्त झाला आहे. तसेच आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने रोहितसह 3 वर्षांचा करार केला आहे.त्यानुसार रोहितला दरवर्षी 16 कोटी 30 लाख रुपये मिळणार आहेत. त्यामुळे रोहितला 49 कोटी रुपये याद्वारे मिळणार आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहितचं नेटवर्थ हे 200 कोटींपेक्षा अधिक आहे. उपलब्ध माहितीनुसार रोहितचं नेटवर्थ हे 218 कोटी इतकं आहे.

जाहीरातीतून खोऱ्याने कमाई

तसेच रोहित शर्मा आदीदास, सिएट, स्वीस वॉच, ड्रीम 11, रसना, ओरल-बी, स्वीगी, मॅक्स लाईफ इंशुरन्स, न्यू एरा आणि आयआयएफएल या कंपनींसाठी जाहीरात करतो. तसेच रोहितला मुंबईतील लोअर परळ येथील एका प्रॉपर्टीतून दरमहा 2 कोटी 60 लाख रुपये भाडं मिळतं.

“वो  किया है”, गुंतवणूक

रोहित गुंतवणुकीतही आघाडीवर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार,रोहितने जवळपास अनेक स्टार्टअप्समध्ये 90 कोटी रुपये गुंतवले आहेत.
रोहितच्या पोर्टफोलियात रॅपिडोबॉटिक्स, वीरूट्स वेलनेस सोल्युशन्स या आणि इतर स्टार्टअप्सचा समावेश आहे. तसेच रोहितची मुंबईत ‘क्रिकेटकिंगडम’ नावाची क्रिकेट अॅकेडमीही आहे.

30 कोटींचं घर

रोहितच्या मुंबईतील घराची किंमत ही 30 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं. रोहितचं सी व्हीव्यू असलेलं अपार्टमेंट हे 6 हजार स्केवअर फुट इतकं आहे.

कार कलेक्शन

दरम्यान रोहितला क्रिकेटप्रमाणे कारचीही आवड आहे. रोहितच्या कार कलेक्शनमध्ये एकसेएक गाड्यांचा समावेश आहे. रोहितच्या कार कलेक्शनमध्ये लॅम्बोर्गिनी अर्स (4 कोटी 18 लाख रुपये) आणि मर्सिडीज बेंझ एस क्लास (1 कोटी 50 लाख) या गाडीचा समावेश आहे.तसेच रोहितकडे मर्सीडीज जीएसएस 400डी, बीएमडब्ल्यू एम 5 आणि रेंज रोव्हर एचएसई एलडब्ल्यूबी या टॉपच्या कार आहेत.