धनश्री वर्मा हीने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत व्हीडिओ शेअर करत सांगितली गूडन्युज

| Updated on: Mar 26, 2023 | 6:51 PM

धनश्री वर्मा हीने व्हीडिओ शेअर करत आपल्या चाहत्यांना गूडन्युज दिली आहे. यामुळे आयपीएलच्या तयारीत असलेला युजवेंद्र चहल याचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

धनश्री वर्मा हीने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत व्हीडिओ शेअर करत सांगितली गूडन्युज
Follow us on

मुंबई | टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल सध्या आयपीएल 16 व्या मोसमाची तयारी करत आहे. चहल राजस्थान रॉयल्स टीमचा भाग आहे. आयपीएलच्या 16 व्या मोसमाला येत्या 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या दरम्यान युजवेंद्र चहल याला त्याची पत्नी धनश्री वर्मा हीच्याकडून गूडन्युज मिळाली आहे. धनश्री हीने शेअर केलेल्या एका व्हीडिओमुळे प्रचंड खूश झाला आहे. धनश्रीने इंस्टाग्रावर एक व्हीडिओ शेअर केला आहे. धनश्रीने हा व्हीडिओ डॉक्टरने गूडन्युज सांगितल्यानंतर शेअर केला आहे.

नक्की काय झालंय?

धनश्री हीला वर्षी 2022 मध्ये दुखापत झाली होती. त्यानंतर धनश्रीवर शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे धनश्रीला बऱ्याच काळापासून डान्सपासून दूर रहावं लागलं होतं. धनश्रीही डान्सर आणि युट्यूबर आहे. दरम्यान अनेक महिन्यांपासून डान्सपासून दूर राहिल्यानंतर अखेर धनश्रीने कमबॅक केलंय. धनश्रीने हा व्हीडिओ डॉक्टरडून मंजूरी मिळाल्यानंतर शेअर केलाय. धनश्री या व्हीडिओत पूर्णपणे फिट दिसून येत आहे.

धनश्रीला डॉक्टरकडून डान्सची परवानगी

आता धनश्री बरी झाल्याने चहलसुद्धा आनंदी आहे. धनश्रीने व्हीडिओ शेअर केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच चहलने हा व्हीडिओ लाईक केला. या दुखापतीदरम्यान धनश्री सोशल मीडियावर एक्टीव्ह होती. ती आपल्या चाहत्यांसोबत स्वत:चे फोटो शेअर करत होती. धनश्रीने बहुतांश फोटोंमध्ये तिने गुडघ्याला कॅप लावली होती.

दरम्यान चहलच्या टीमचा अर्थात राजस्थान रॉयल्सचा पहिला सामना 2 एप्रिल रोजी सनराजजर्स विरुद्ध खेळवण्यात येणार आहे. चहल हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाचा भाग होता. मात्र चहलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती.

राजस्थान रॉयल्स टीम

संजू सॅमसन (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, जोस बटलर, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव, नवदीप सैनी, कुलदीप सेन, ओबेड मॅकॉय, केसी करिअप्पा, युजवेंद्र चहल, ट्रेन्ट बोल्ट, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, जो रुट, एडम जेम्पा, डोनोवन फरेरा, के.एम् आसिफ, अब्दुल पीए, आकाश वशिष्ठ, कुनाल राठोड आणि मुरगन अश्विन।