
मुंबई: टीम इंडिया (Team India) सध्या आशिया कप (Asia cup) स्पर्धा खेळत असून त्यांनी सुपर 4 फेरीत प्रवेश केला आहे. खरंतर टीम इंडियाच सगळं लक्ष टी 20 वर्ल्ड कपवर (T 20 World cup) आहे. यावेळी ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. वर्ल्ड कपच्या टीमची घोषणा करण्यासाठी 14 दिवस बाकी आहेत. टीम इंडियात कोणाला स्थान मिळणार? याबद्दल उत्सुक्ता आहे. आतापासूनच या बद्दल वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. सर्व क्रिकेट बोर्डांना 15 सप्टेंबर पर्यंत आपल्या स्क्वाडची माहिती द्यावी लागेल, हे आयसीसीने आधीच जाहीर केलय. वर्ल्डकपचे यजमान ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपसाठी आपल्या टीमची घोषणा केली आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्डकपची तयारी करतोय. सध्या भारतीय संघ आशिया कप मध्ये खेळतोय. मागच्या काही सीरीज मधील टीम इंडियाची टी 20 मधील कामगिरी लक्षात घेऊन वर्ल्ड कपसाठी संघ निवडला जाणार आहे. या टीम मध्ये काही खेळाडूंच स्थान पक्क आहे. फक्त दोन ते तीन जागांसाठी स्पर्धा आहे. त्यावर विचार मंथन होईल. कोणाला संधी मिळणार? आणि कोणाला डच्चू? या बद्दल उत्सुक्ता आहे. 15 सप्टेंबरला टी 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा होऊ शकते.
1 रोहित शर्मा (कॅप्टन)
2 केएल राहुल (उपकर्णधार)
3 विराट कोहली
4 सूर्यकुमार यादव
5 ऋषभ पंत
6 दिनेश कार्तिक
7 हार्दिक पंड्या
8 रवींद्र जडेजा
9 भुवनेश्वर कुमार
10 जसप्रीत बुमराह (सध्या दुखापतग्रस्त)
11 हर्षल पटेल (सध्या दुखापतग्रस्त)
12 युजवेंद्र चहल
13 रविचंद्रन अश्विन
14 अर्शदीप सिंह
15 दीपक हुड्डा
वरती नमूद केलेल्या सर्वच्या सर्व 15 खेळाडूंची जागा पक्की आहे, असं म्हणता येणार नाही. काही खेळाडू सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत. त्याशिवाय टीम कॉम्बिनेशनच्या हिशोबाने सुद्धा काही खेळाडूंचा संघात समावेश केला जाऊ शकतो. यात श्रेयस अय्यर, आवेश खान, उमरान मलिक, दीपक चाहर, रवी बिश्नोई, इशान किशन हे खेळाडू आहेत. भारताच्या टी 20 वर्ल्ड कप संघात कोणाला संधी मिळते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.