AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC Australia Squad: T20 WC, भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा, संघात फक्त एक बदल

ऑस्ट्रेलियाने टी 20 वर्ल्ड कप (T 20 World cup) आणि भारत दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली आहे. टीम मध्ये 15 खेळाडूंना स्थान दिलं आहे.

T20 WC Australia Squad: T20 WC, भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा, संघात फक्त एक बदल
Australian TeamImage Credit source: twitter
| Updated on: Sep 01, 2022 | 8:21 AM
Share

मुंबई: ऑस्ट्रेलियाने टी 20 वर्ल्ड कप (T 20 World cup) आणि भारत दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली आहे. टीम मध्ये 15 खेळाडूंना स्थान दिलं आहे. एरॉन फिंचकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलय. ऑस्ट्रेलियाचा संघ सप्टेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर (IND vs AUS) येणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये टी 20 वर्ल्ड कप आहे. भारत दौऱ्यावर येणाऱ्या आणि टी 20 वर्ल्ड कप टीम मध्ये ऑस्ट्रेलियाने फक्त एक बदल केला आहे. ऑस्ट्रेलियाचा आक्रमक डावखुरा फलंदाज डेविड वॉर्नरची (David Warner) भारत दौऱ्यासाठीच्या संघात निवड केलेली नाही. वॉर्नर भारत दौऱ्यावर येणार नाहीय. त्याच्याजागी कॅमरुन ग्रीनची निवड केली आहे. मागच्या वर्षी UAE मध्ये झालेल्या टी 20 वर्ल्ड कपसाठी जो संघ निवडला होता, आताचा संघही बहुतांश तसाच आहे. फक्त लेग स्पिनर मिचेल स्वेपसनच्या जागी टिम डेविडचा संघात समावेश केला आहे.

डेविड वॉर्नरला भारत दौऱ्यासाठी आराम

टी 20 वर्ल्ड कप 2O22 साठी निवडलेली ही टीम सप्टेंबर मध्ये भारत दौऱ्यावर येईल. भारत दौऱ्यासाठी डेविड वॉर्नरला आराम देण्यात आला आहे. त्याच्याजागी कॅमरुन ग्रीनचा संघात समावेश करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याच शेड्युल

ऑस्ट्रेलियन टीम भारत दौऱ्यावर तीन T20 सामन्यांची सीरीज खेळणार आहे. ही सीरीज ऑस्ट्रेलियाच्या टी 20 वर्ल्ड कप मोहिमेचा भाग आहे. 20, 23 आणि 25 सप्टेंबरला मोहाली, नागपूर आणि हैदराबाद मध्ये हे सामने होणार आहेत. टी 20 वर्ल्ड कप मध्ये ऑस्ट्रेलियाच अभियान 22 ऑक्टोबरला सुरु होणार आहे. गत विजेता ऑस्ट्रेलियन संघ विजेतेपद कायम टिकवण्याचा प्रयत्न करेल. ऑस्ट्रेलियासाठी चांगली बाब म्हणजे हा टी 20 वर्ल्ड कप त्यांच्याच देशात होत आहे.

T20 WC आणि भारत दौऱ्यासाठी निवडण्यात आलेला ऑस्ट्रेलियन संघ

ऑस्ट्रेलियाची टी20 वर्ल्ड कप टीम: एरॉन फिंच (कॅप्टन), पॅट कमिन्स (उप-कर्णधार), टिम डेविड, एस्टन एगर, जोश हेजलवुड, जोस इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्ड्सन, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिश, मॅथ्यू वेड, डेविड वॉर्नर, एडम जंपा

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.