छोरियां छोरो से कम है के! भारताच्या पोरींनी रचला आशिया कपमध्ये इतिहास, टी-20 मध्ये पहिल्यांदाच अशी कामगिरी

आशिया कपमध्ये महिला भारतीय संघाने दमदार कामगिरी केली आहे. स्पर्धेतील दुसरा विजय मिळवत आशिया कपमध्ये इतिहास रचला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच अशी कामगिरी महिला भारतीय संघाने केली आहे.

छोरियां छोरो से कम है के! भारताच्या पोरींनी रचला आशिया कपमध्ये इतिहास, टी-20 मध्ये पहिल्यांदाच अशी कामगिरी
| Edited By: | Updated on: Jul 23, 2024 | 8:08 PM

आशिया कपमध्ये महिला भारतीय संघाने आपली विजय घौडदौड कायम ठेवली आहे. पाकिस्तानचा सात विकेटने पराभव केल्यानंतस यूएईला पराभूत करत सलग दुसऱ्या विजय मिळवलाय. महिला भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 201-5 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना यूईला संघाला 20 ओव्हरमध्ये 123-7 धावा केल्या. या विजयासह महिला भारतीय संघाने सेमी फायनलमध्ये आपली जागा आणखी पक्की केली आहे. भारतीय संघाने हा साामना जिंकत वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली आहे.

आजच्या सामन्यात महिला भारतीय संघाकडून कर्णधार हरमनप्रीतने सिंह 66 धावा आणि ऋचा घोषने 64 धावा केल्या. त्यासोबतच लेडी सेहवाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेफाली वर्मानेही 37 धावांचे महत्त्वाचे योगदान दिले होते. या सामन्यात भारतीय संघाने 200 पेक्षा जास्त धावा करत मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये भारतीय महिला संघाची सर्वोच्च धावसंख्या:
UAE विरुद्ध- 201 धावा
इंग्लंडविरुद्ध – 198धावा
न्यूझीलंडविरुद्ध – 194 धावा
ऑस्ट्रेलियाविरुद्ध – 187 धावा

महिला T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणारे संघ:
भारतीय महिला संघ- 201 धावा
भारतीय महिला संघ- 181 धावा
भारतीय महिला संघ- 178 धावा
पाकिस्तानी महिला संघ- 177 धावा
भारतीय महिला संघ- 169 धावा

आंतरराष्ट्रीय महिला टी-20 सामन्यांमध्ये भारतीय महिला संघाने 201 धावा करत टी-20आशिया कपच्या इतिहासातील सर्वोत्तम धावसंख्या नोंदवली. आतापर्यंत कोणत्याही संघाला 200 धावा करता आल्या नाहीत. उलट भारतीय महिला संघाने 2022 ला मलेशियाविरूद्ध 181 धावांचा डोंगर उभारला होता. आता हा विक्रम मोडला गेला असून आणखी मोठा विक्रम आपल्या नावावर करत शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय.

वूमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), शफाली वर्मा, स्मृती मंधाना, दयालन हेमलता, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, रेणुका ठाकुर सिंग आणि तनुजा कंवर.

वूमन्स यूएई प्लेइंग ईलेव्हन: ईशा रोहित ओझा (कॅप्टन), तीर्थ सतीश (विकेटकीपर), रिनीता राजित, समायरा धरणीधारका, कविशा इगोडागे, खुशी शर्मा, हीना होतचंदानी, वैष्णवे महेश, रितीका राजित, लावण्य केणी आणि इंधुजा नंदकुमार