IND vs AUS Test : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला दिल्ली कसोटीत चिरडलं, दिमाखदार विजय

IND vs AUS Test : नागपूरप्रमाणे टीम इंडियाने दुसरी कसोटी तीन दिवसात निकाली काढली. बॉर्डर-गावस्कर सीरीजच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाकडे 2-0 अशी आघाडी आहे.

IND vs AUS Test : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला दिल्ली कसोटीत चिरडलं, दिमाखदार विजय
ind vs aus test
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 19, 2023 | 2:15 PM

IND vs AUS 2nd Test : टीम इंडियाने दुसरा कसोटी सामना जिंकला आहे. दिल्ली कसोटीत टीम इंडियाने नागपूरप्रमाणे दिमाखदार विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दुसरा कसोटी सामना 6 विकेटने जिंकला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेलं 115 धावांच लक्ष्य चार विकेट गमावून आरामात पार केलं. नागपूरप्रमाणे टीम इंडियाने दुसरी कसोटी तीन दिवसात निकाली काढली. बॉर्डर-गावस्कर सीरीजच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाकडे 2-0 अशी आघाडी आहे. तीन खेळाडूंच्या बळावर टीम इंडियाने दिल्ली कसोटीत वर्चस्व गाजवलं. त्यांच्या बळावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला अक्षरक्ष: चिरडलं असं म्हणाव लागेल. रविंद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल हे टीम इंडियाच्या विजयाचे हिरो ठरले.

तिसऱ्यादिवशी ऑस्ट्रेलियाने शस्त्र टाकली

ऑस्ट्रेलियन टीम आज थोडी चांगली खेळली असती, तर कदाचित दुसरं चित्र पहायला मिळालं असतं. दुसऱ्यादिवसाचा खेळ संपताना त्यांची कसोटीवर पकड दिसत होती. 1 बाद 61 अशी ऑस्ट्रेलियाची स्थिती होती. आज रविवारी तिसऱ्यादिवशी ऑस्ट्रेलियन टीमने शरणागती पत्करली. त्यांनी 52 धावात 9 विकेट गमावल्या. यात अश्विन आणि जाडेजा जोडीची महत्त्वाची भूमिका होती.

एक रन्सवर गमावले 4 विकेट

आज दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्यादिवशी पहिलं सेशन संपण्याआधीच ऑस्ट्रेलियाचा डाव आटोपला. ऑस्ट्रेलियाने 18.2 ओव्हर्समध्ये 52 धावा देऊन 9 विकेट गमावल्या. यात फक्त एक रन्सवर चार विकेट गमावल्या. त्यावेळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 95 होती. स्वीप शॉट खेळण्याचा मोह कांगारुंना भारी पडला. दुसऱ्याडावात त्यांचे 6 फलंदाज या नादात तंबुत परतले.


पुजाराच्या 100 व्या कसोटी सामन्यात भारताचा विजय

ऑस्ट्रेलियाच्या 115 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 4 विकेट गमावून विजय मिळवला. यात 100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराची भूमिका महत्त्वाची होती. पुजाने एकबाजू लावून धरली. पुजारा शेवटपर्यंत नाबाद राहिला. टीमला त्याने विजय मिळवून दिला.

टीम इंडियाचे 3 स्टार

टीम इंडियाच्या या विजयात रविंद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांची भूमिका महत्त्वचाी होती. रविंद्र जाडेजाने दुसऱ्याडावात 7 एकूण मिळून 10 विकेट घेतले. अश्विनने दोन्ही डावात मिळून 6 आणि अक्षर पटेलने पहिल्या डावात टीमला गरज असताना 115 चेंडूत 74 धावा केल्या. त्याने ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी घेण्यापासून रोखलं. या तिघांनी टीमच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलं.