मे गिर जाऊंगीsss : होळी दिवशी मोहम्मद शमी याची पत्नी बेभान होऊन नाचली, व्हिडीओ तुफान व्हायरल
Hasin Jahan Viral Holi Dance Video : टीम इंडियाचा स्टार खेळाडू असलेल्या मोहम्मद शमी याच्या पत्नीच्या डान्सचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. होळी दिवशीचा हसीन जहाँने केलेल्या डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेला दिसत आहे.

टीम इंडियाचा स्टार खेळाडू मोहम्मद शमी याची पत्नी कायम कोणत्या ना कारणामुळे चर्चेत असलेली पाहायला मिळते. हसीन जहाँ आणि शमीमध्ये कौटुंबिक वाद असून कोर्टात केस सुरू आहे. दोघे एकत्र राहत नाहीत, हसीन जहाँ आपल्या मुलीला घेऊन वेगळी राहते. अशातच सोशल मीडियावर हसीन जहाँचा होळीच्या दिवशी डान्स करतानाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.
पाहा व्हिडीओ:-
View this post on Instagram
होळीला हसीन जहाँने जोरदार डान्स केला, इंस्टाग्रामवर तिने व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये ती आणि इतर दोन मुलीही हसीन जहाँसोबत रंग, गुलाल आणि पाण्याच्या उधळणात नाचताना दिसत आहेत. ‘जय-जय शिव शंकर, कांटा लगे न कंकड’ या गाण्यावरील स्टेप्स घायाळ करणाऱ्या आहेत.
View this post on Instagram
हसीन जहाँचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून काही नेटकरी तिला ट्रोल करत आहेत तर काही तिच्या डान्सचं कौतुक करत आहेत. हसीन जहाँचे इंस्टाग्रामवर जवळपास तीन लाख फॉलोअर्स आहेत. दोघांमधील भांडण कोर्टापर्यंत गेलं असून अजुनही केस सुरू आहे. हसीन जहाँने मोहम्मद शमीसह त्याच्या घरच्यांवर हुंड्यासाठी छळ आणि शमीने बलात्काराचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
मोहम्मद शमी आता क्रिकेटच्या मैदानापासून दुखापतीमुळे दूर आहे. आता झालेल्या वन डे वर्ल्ड कपमध्ये त्याने चमकदार कामगिरी केली होती. भारताकडून वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक वर्ल्ड कप जिंकणारा तो खेळाडू ठरला. मात्र आता दुखापतीने तो आगामी टी-20 वर्ल्ड आणि आयपीएलला मुकला आहे.
