5 बॉल 5 सिक्स, Kireon Pollardचा राशिद खानच्या बॉलिंगवर तडाखा, व्हीडिओ

Kieron Pollard hitting 5 Sixes In A Row: वेस्ट इंडिजचा माजी स्फोटक अष्टपैलू किरॉन पोलार्ड याने द हन्ड्रेड या स्पर्धेत राशिद खानच्या बॉलिंगवर सलग 5 बॉलमध्ये 5 सिक्स ठोकले.

5 बॉल 5 सिक्स, Kireon Pollardचा राशिद खानच्या बॉलिंगवर तडाखा, व्हीडिओ
rashid khan kieron pollard 5 six
| Updated on: Aug 10, 2024 | 11:43 PM

द हन्ड्रेड या स्पर्धेत 10 ऑगस्ट रोजी साउथर्न ब्रेव्ह विरुद्ध ट्रेन्ट रॉकेट्स संघ आमनेसामने होते. साउथर्न ब्रेव्हने या सामन्यात 2 विकेट्सने विजय मिळवला आहे. ट्रेन्ट रॉकेट्सने साउथर्न ब्रेव्हला विजयासाठी 100 बॉलमध्ये 127 धावांचं आव्हान दिलं होतं. साउथर्न ब्रेव्हने हे आव्हान 1 बॉल राखून पूर्ण केलं. साउथर्न ब्रेव्हने 8 विकेट्स गमावून 99 बॉलमध्ये हे आव्हान पूर्ण केलं. ऑलराउंडर किरॉन पोलार्ड हा साउथर्न ब्रेव्हच्या विजयाचा हिरो ठरला. पोलार्डने 195. 65 च्या स्ट्राईक रेटने 2 चौकार आणि 5 खणखणीत षटकारांच्या मदतीने 23 चेंडूत 45 धावांची विस्फोटक खेळी केली. विशेष म्हणजे पोलार्डने या खेळीतील 5 सिक्स हे सलग ठोकले. पोलार्डने अफगाणिस्तानचा कर्णधार असलेला राशिद खान याच्या बॉलिंगवर हा कारनामा केला.

5 बॉल 5 सिक्स, किरॉन पोलार्डचा तडाखा

पोलार्डने 81, 82, 83, 84 आणि 85 व्या बॉलवर सलग 5 सिक्स ठोकले. राशिद खानने आपल्या बॉलिंगच्या जोरावर अनेकांना गुंडाळलं आहे. याच राशिदने आपल्या नेतृत्वात चमकदार बॉलिंगच्या जोरावर अफगाणिस्तानला टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील उपांत्य फेरीपर्यंत पोहचवलं. राशिदने अनेकदा बॉलिंगच्या जोरावर अशक्य असे विजय मिळवून दिले. मात्र राशिदची पोलार्डसमोर जादू चालली नाही. पोलार्डने राशिदला झोडत सलग 5 बॉलमध्ये 5 सिक्स ठोकले. पोलार्डच्या या खेळीमुळे साउथर्न ब्रेव्हला 1 बॉलआधी विजय मिळवता आला. पोलार्डच्या या फटकेबाजीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

साउथर्न ब्रेव्ह प्लेइंग ईलेव्हन : जेम्स व्हिन्स (कर्णधार), ॲलेक्स डेव्हिस (विकेटकीपर), आंद्रे फ्लेचर, लेउस डू प्लॉय, लॉरी इव्हान्स, कायरन पोलार्ड, ख्रिस जॉर्डन, अकेल होसेन, डॅनी ब्रिग्स, जोफ्रा आर्चर आणि टायमल मिल्स.

ट्रेन्ट रॉकेट्स प्लेइंग ईलेव्हन : लुईस ग्रेगरी (कर्णधार), टॉम बँटन (विकेटकीपर), ॲडम लिथ, ॲलेक्स हेल्स, जो रूट, रोव्हमन पॉवेल, इमाद वसीम, रशीद खान, जॉन टर्नर, ल्यूक वुड आणि सॅम कुक.