
तामिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धा मंकडिंग प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मंकडिंग प्रकरणामुळे आर अश्विन चर्चेत आला आहे. त्याने घेतलेल्या विकेट्स वादाचं कारण ठरलं आहे. पण सर्वकाही नियमात असल्याने तसं काही कारण शिल्लक उरलं नाही. असं असताना आर अश्विन तामिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धेत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी फक्त गोलंदाज नाही तर फलंदाज होता. नॉन स्ट्राईकला उभ्या असलेल्या आर अश्विनला गोलंदाजाने वॉर्निंग दिली. क्रीज आधीच सोडत असल्याचं पंचांना देखील सांगितलं. यावरून आता सोशल मीडियावर वाद सुरु आहे. एक्स या सोशल मीडियावर एका युजर्सला उत्तर देताना आर अश्विनने आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. एका पोस्टमध्ये लिहिलं होतं की, अश्विन आऊट झाला असता जर गोलंदाजाने बेल्स उडवली असती. त्यावर उत्तर देताना अश्विनने लिहिलं आहे की, त्यांना नियम माहिती नाही.
नियम 8.3 नुसार क्रीज सोडण्यासंदर्भातील नियम दिला गेला आहे. यात स्पष्ट केलं आहे की, ‘बॉल खेळात येण्याच्या कोणत्याही क्षणी जेव्हा गोलंदाजाने चेंडू सोडणे अपेक्षित असते. तेव्हा नॉन-स्ट्रायकर फलंदाज क्रीजबाहेर असेल तर तो धावबाद होऊ शकतो.’ आर अश्विनला वॉर्निंग दिल्यानंतर त्याची कृती रिप्लेमध्ये पाहिली गेली. अश्विनची बॅट सुरुवातीला क्रिजच्या आत होती. जेव्हा गोलंदाजाने त्याची कृती थांबवली तेव्हा पुढे जाण्याआधीच तो क्रिझमध्ये परतला होता. दुसरीकडे आर अश्विनने नियमांवर बोट ठेवल्यानंतर त्याला आयपीएलमधील मंकडिंगची आठवण अनेकांनी करून दिली.
Cos they don’t know the rule😂 pic.twitter.com/r1B6Ndyyue
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) July 29, 2024
नेलई रॉयल किंग्सकडून 15 वं षटक टाकण्यासाठी मोहन प्रसाथ मैदानात आला होता. दुसरा चेडू टाकताना मात्र मोहन प्रसाथ थांबला आणि अश्विन क्रिज सोडत असल्याचं दाखवून दिलं. पहिल्यांदाच त्याला मंकडिंगची वॉर्निंग मिळाली. त्यामुळे याबाबतची चर्चा रंगली आहे.
A Warning to Ravichandran Ashwin at the non-striker end in TNPL. 😀 pic.twitter.com/CMqwJxoiQz
— Johns. (@CricCrazyJohns) July 28, 2024
डिंडीगुल ड्रॅगन्स (प्लेइंग इलेव्हन): विमल खुमर, शिवम सिंग, बाबा इंद्रजीथ (विकेटकीपर), सी सरथ कुमार, रविचंद्रन अश्विन (कर्णधार), बूपती कुमार, एस दिनेश राज, सुबोथ भाटी, वरुण चक्रवर्ती, पी विघ्नेश, व्हीपी दिरान
नेल्लई रॉयल किंग्स (प्लेइंग इलेव्हन): लक्ष्मेशा सूर्यप्रकाश, अजितेश गुरुस्वामी (कर्णधार), निधिश राजगोपाल, एसजे अरुण कुमार, रितिक इसवरन (विकेटकीपर), सोनू यादव, एनएस हरीश, एन काबिलन, एस मोहन प्रसाथ, आर सिलांबरसन, जे रोहन.