ठाकरे बंधूंकडून भगवा गार्डचा नवा प्रयोग! 2 हजार पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण
ठाकरे बंधूंकडून भगवा गार्डचा नवा प्रयोग करण्यात आला आहे. मत चोरीवर करडी नजर ठेवण्यासाठी भगवा गार्डचा प्रयोग करण्यात आला आहे. यासाठी तब्बल 2 हजार पदाधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देखील देण्यात आलेलं आहे. मतदान केंद्रांच्या बाहेर भगवा गार्ड 15 जानेवारीला तैनात करण्यात येईल. मत चोरी, दुबार मतदान, बोगस मतदान रोखण्याचा प्रयत्न या प्रयोगातून ठाकरे बंधूंकडून केला जाणार […]
ठाकरे बंधूंकडून भगवा गार्डचा नवा प्रयोग करण्यात आला आहे. मत चोरीवर करडी नजर ठेवण्यासाठी भगवा गार्डचा प्रयोग करण्यात आला आहे. यासाठी तब्बल 2 हजार पदाधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देखील देण्यात आलेलं आहे. मतदान केंद्रांच्या बाहेर भगवा गार्ड 15 जानेवारीला तैनात करण्यात येईल. मत चोरी, दुबार मतदान, बोगस मतदान रोखण्याचा प्रयत्न या प्रयोगातून ठाकरे बंधूंकडून केला जाणार आहे.
बोगस मतदान, मतचोरी, दुबार मतदार हे गैरप्रकार टाळण्यासाठी शिवसेना उबाठा पक्ष आणि मनसे हे उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंचे पक्ष सज्ज झाले आहेत. या दोन्ही पक्षांकडून मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांबाहेर ‘भगवा गार्ड’ तैनात करण्यात येणार आहेत. अशा दोन हजार गार्डची या गैरप्रकारांवर करडी नजर असेल.

