‘इंडियन आयडॉल’ विजेत्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; 3 वर्षीय मुलीची अशी अवस्था, हृदय पिळवटून टाकणारा Video
प्रसिद्ध गायक आणि अभिनेता प्रशांत तमांगच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशांतला अंतिम निरोप देताना त्याची पत्नी ढसाढसा रडली, तर त्याच्या तीन वर्षाच्या मुलीची अवस्था पाहून नेटकरीही भावूक झाले.

‘इंडियन आयडॉल 3’चा विजेता प्रशांत तमांगच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अवघ्या 43 व्या वर्षी प्रशांतने या जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. कार्डिअॅक अरेस्टने त्याचं निधन झाल्याचं समजतंय. सोमवारी प्रशांतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रशांतची पत्नी मार्था एले ढसाढसा रडली. तर त्यांच्या तीन वर्षीय मुलीची अवस्था पाहून सर्वांचं हृदय पिळवटून निघालं. सोमवारी प्रशांतचं पार्थिव बागडोगरा विमानतळावर आणण्यात आलं. यावेळी कुटुंबीयांसह, मित्रपरिवार आणि चाहत्यांनी प्रशांतच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं. त्यानंतर ते पार्थिव दार्जिलिंगला नेण्यात आलं होतं. तिथेनी प्रशांतला अखेरचा निरोप देण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये प्रशांतच्या पार्थिवासमोर त्याची पत्नी मार्था ढसाढसा रडताना दिसून येत आहे. यावेळी तिच्या बाजूला असलेली तीन वर्षांची मुलगी वडिलांना अशा अवस्थेत पाहून गुमसून झाली होती. प्रशांतच्या मुलीला पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. इतक्या लहान वयात चिमुकलीच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरवल्याने नेटकऱ्यांनीही भावना व्यक्त केल्या. कुटुंबीयांना अशा अवस्थेत पाहून चाहत्यांचेही डोळे पाणावले.
पहा व्हिडीओ
#WATCH | Siliguri, West Bengal: Mortal remains of Indian Idol winner and actor Prashant Tamang brought at Bagdogra Airport. His mortal remains will be taken to Darjeeling for the last rites. pic.twitter.com/pZjlNtIdgR
— ANI (@ANI) January 12, 2026
प्रशांत दिल्ली इथल्या घरात पत्नी आणि मुलीसोबत राहत होता. याप्रकरणी त्याच्या पत्नीचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. प्रशांतला यापूर्वी कोणत्याही गंभीर आरोग्याच्या समस्यांची लक्षणं दिसली नव्हती. त्यामुळे अचानक आणि अनपेक्षिकपणे आलेल्या कार्डिअॅक अरेस्टने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. “प्रशांत बाजूला झोपलेला होता. झोपेतच त्याचं निधन झालं”, असं पत्नी मार्थाने जबाबात म्हटलं आहे.
दिल्लीतील राहत्या घरी प्रशांतचं 11 जानेवारी रोजी निधन झालं होतं. 2007 मध्ये त्याने ‘इंडियन आयडॉल 3’चं विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर तो देशभरात लोकप्रिय झाला होता. प्रशांतने गायनासोबत अभिनयक्षेत्रातही नाव कमावलं होतं. अनेक नेपाळी चित्रपटांमध्ये त्याने मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्याचसोबत ‘पाताल लोक 2’मध्येही त्याने काम केलं होतं. त्याने सलमान खानच्या आगामी ‘बॅटल ऑफ गलवान’मध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. प्रशांतचा हा शेवटचा चित्रपट असेल.
