AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022, DC vs SRH, Live Streaming : आज दिल्ली विरुद्ध हैदराबाद सामना, जाणून घ्या कधी, कुठे पाहता येईल सामना?

दिल्ली पॉईंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानी आहे. तर सनराइजर्स हैदराबाद पाचव्या स्थानी आहे. यामुळे आजच्या सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचं विशेष लक्ष असणार आहे.

IPL 2022, DC vs SRH, Live Streaming : आज दिल्ली विरुद्ध हैदराबाद सामना, जाणून घ्या कधी, कुठे पाहता येईल सामना?
DC vs SRH आजच्या सामन्याकडे खास लक्ष असणार आहे.Image Credit source: tv9
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: May 05, 2022 | 9:50 AM
Share

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या  सीजनमध्ये आज दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद (SRH) सामना खेळवला जाणार आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना होणार आहे. दिल्ली विरुद्ध हैदराबादचा टॉस संध्याकाळी सात वाजता होईल. त्यानंतर साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार असून क्रिकेटप्रेमींच आजच्या सामन्याकडे खास लक्ष असणार आहे. पॉईंट्स टेबलचा विचार केल्यास दिल्ली कॅपिटल्सने एकूण 9 सामने खेळले आहेत. त्या सामन्यांपैकी दिल्लीला 4 सामन्यात विजय मिळाला आहे. तर 5 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. दिल्लीचा नेट रेट 0.587 इतका आहे. तर दिल्ली संघाला पॉईंट्स टेबलमध्ये 8 गुण मिळाले असून तो सातव्या स्थानी आहे. दुसरीकडे सनरायइजर्स हैदराबाद हा संघ पॉईट्समध्ये पाचव्या स्थानी आहे. हैदराबाद संघाने एकूण 9 सामने खेळले असून त्यापैकी 5 सामन्यात संघाला यश आलंय. तर 4 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. हैदराबाद संघाचा नेट रेट 0.471 इतका आहे.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद यांच्यातील सामना कधी खेळवला जाईल?

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल 2022 मधील सामना आज 5 मे  (गुरुवार) रोजी खेळवला जाणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद यांच्यातील सामना कुठे खेळवला जाईल?

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद यांच्यातील सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाईल.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद यांच्यातील सामना कधी सुरू होईल?

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद यांच्यातील सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. नाणेफेक संध्याकाळी सात वाजता होईल.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) तुम्ही कुठे पाहता येईल?

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी वर होईल.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कोठे होईल?

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने + हॉटस्टार, जिओ टीव्ही आणि एअरटेल टीव्हीवर पाहता येईल. तुम्ही Tv9marathi.com वर सामन्याचे सर्व लाइव्ह अपडेट्स वाचू शकता.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ