AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India: टीम इंडियासाठी 100 टी 20i सिक्स लगावणारे फलंदाज, सर्वाधिक कुणाच्या नावावर?

Most Sixes in T20 For India: अभिषेक शर्मा याने इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या टी 20i सामन्यात अर्धशतकी खेळीत 4 षटकार लगावले. अभिषेकने यासह टी 20i क्रिकेटमध्ये षटकारांचं शतक पूर्ण करत खास कामगिरी करुन दाखवली.

Team India: टीम इंडियासाठी 100 टी 20i सिक्स लगावणारे फलंदाज, सर्वाधिक कुणाच्या नावावर?
Abhishek Sharma India vs England 1st T20iImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Jul 02, 2026 | 9:34 PM
Share

इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील पहिला टी 20i सामना हा 1 जुलैला खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाचा ओपनर बॅट्समन अभिषेक शर्मा याने अर्धशतक ठोकलं. अभिषेकने इंग्लंड विरुद्ध 59 धावांची वादळी खेळी साकारली. अभिषेकने या दरम्यान 4 षटकार लगावले. अभिषेकने यासह टी 20i क्रिकेटमध्ये 100 षटकार पूर्ण केले. अभिषेक बॉलनुसार सर्वात वेगवान 100 सिक्स लगावणारा पहिला फलंदाज ठरला. अभिषेकने 785 बॉलमध्ये 100 सिक्स पूर्ण केले. या निमित्ताने टीम इंडियासाठी टी 20i मध्ये 100 षटकार लगावणाऱ्या फलंदाजांबाबत जाणून घेऊयात.

टीम इंडियासाठी आतापर्यंत टी 20i क्रिकेटमध्ये एकूण 5 फलंदाजांनी 100 पेक्षा अधिक षटकार लगावले आहेत. तसेच 5 पैकी एका फलंदाजाने 200 पेक्षा अधिक षटकार लगावले आहेत.

भारतासाठी सर्वाधिक टी 20i षटकार

माजी फलंदाज रोहित शर्मा याच्या नावावर टीम इंडियासाठी सर्वाधिक टी 20i षटकारांचा विक्रम आहे. रोहित 200 पेक्षा अधिक षटकार लगावणारा एकमेव भारतीय आहे. रोहितने टी 20i क्रिकेटमध्ये 205 षटकार लगावले आहेत. तर रोहितनंतर या यादीत दुसऱ्या स्थानी सूर्यकुमार यादव हा विराजमान आहे. सूर्याने आतापर्यंत 179 षटकार लगावले आहेत.

टी 20i मध्ये सर्वाधिक सिक्स लगावणारे भारतीय

अभिषेक शर्मा : 102 षटकार विराट कोहली : 124 षटकार हार्दिक पंड्या : 126 षटकार सूर्यकुमार यादव : 179 षटकार रोहित शर्मा : 205 षटकार

सूर्यानंतर या यादीत तिसऱ्या स्थानी हार्दिक पंड्या विराजमान आहे. तर चौथ्या स्थानी माजी फलंदाज विराट कोहली आहे. तर अभिषेक शर्मा 100 टी 20i षटकार पूर्ण करणारा पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. अभिषेक शर्मा टी 20i क्रिकेटमध्ये वेगवान 100 षटकार लगावणारा फलंदाज ठरला आहे. अभिषेकने 785 बॉलमध्ये 100 षटकार लगावले आहेत.

पहिला सामना पावसामुळे रद्द

दरम्यान इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिला टी 20i सामना हा पावसामुळे रद्द करावा लागला. या सामन्यातील पहिल्या डावाचा खेळ झाला. मात्र पावसामुळे दुसऱ्या डावातील खेळ होणार नसल्याने सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारताने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 189 धावा केल्या होत्या.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?