Asia Cup स्पर्धेतील एका सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज, टॉप 5 मध्ये मोहम्मद सिराजचा समावेश

Asia Cup 2025 : वनडे आशिया कप 2023 च्या फायलनमध्ये टीम इंडियाच्या मोहम्मद सिराज याने 6 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतरही सिराज आशिया कप स्पर्धेतील एका सामन्यात सर्वाधिक विकेट्स मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. पहिला नंबर कुणाचा?

Asia Cup स्पर्धेतील एका सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज, टॉप 5 मध्ये मोहम्मद सिराजचा समावेश
Mohammed Siraj Team India
Image Credit source: AFP
| Updated on: Aug 30, 2025 | 11:46 PM

आशिया कप 2025 स्पर्धेतील सर्व सामने हे टी 20 फॉर्मेटने होणार आहेत. आगामी टी 20 वर्ल्ड कप 2026 च्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या बहुप्रतिक्षित स्पर्धेला यूएईमध्ये 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. यंदा या स्पर्धेत पहिल्यांदाच 6 ऐवजी 8 संघ खेळणार आहेत. तसेच ओमानची या स्पर्धेत खेळण्याची पहिलीच वेळ ठरणार आहे. त्यामुळे ओमान क्रिकेट टीम उत्साहीत आहे. तर दुसऱ्या बाजूला गतविजेत्या भारतीय संघासमोर सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात ही ट्रॉफी आपल्याकडे कायम ठेवण्याचं आव्हान असणार आहे. या स्पर्धेनिमित्ताने आशिया कपमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्या 5 गोलंदाजांबाबत जाणून घेऊयात. या यादीत पहिल्या 5 गोलंदाजांमध्ये 3 भारतीय आहेत.

अजंता मेंडीस पहिल्या स्थानी

आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात एका सामन्यात सर्वात जास्त विकेट्स घेण्याचा विक्रम हा श्रीलंकेचा माजी फिरकीपटू अजंता मेंडीस याच्या नावावर आहे. मेंडीसने टीम इंडिया विरुद्ध 2008 साली सर्वाधिक विकेट्स घेण्याची विक्रमी कामगिरी केली होती. मेंडीसचा हा विक्रम गेल्या 17 वर्षांपासून कायम आहे. मेंडीसने 17 वर्षांपूर्वी अवघ्या 13 धावांच्या मोबदल्यात टीम इंडियाच्या बॅटिंगचं कंबरडं मोडलं होतं. मेंडीसने 6 फलंदाजांना बाद केलं होतं.

मोहम्मद सिराज

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने 2023 च्या आशिया कप फायनलमध्ये धमाका केला होता. सिराजने श्रीलंकेविरुद्ध 21 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या.सिराज या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.

भुवनेश्वर कुमार

भारताच्या भुवनेश्वर कुमार याने 3 वर्षांपूर्वी अफगाणिस्तान विरुद्ध जोरदार पंच लगावला होता. भुवीने 2022 साली मात्र 4 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या. भुवीने टी 20 आशिया कपमध्ये ही कामगिरी केली होती.

चौथ्या स्थानी कोण?

आशिया कप स्पर्धेतील एका सामन्यात सर्वाधिक विकेट्स मिळवणाऱ्या गोलंदाजांमध्ये पाकिस्तानचा माजी खेळाडू आकिब जावेद चौथ्या स्थानी आहे. आकिबने 1995 साली टीम इंडिया विरुद्ध 19 धावा देत 5 विकेट्स मिळवल्या होत्या. आकिबचा हा रेकॉर्ड मेंडीसने 13 वर्षांनंतर ब्रेक केला होता.

अर्शद अयूब

अर्शद अयूब आशिया कप स्पर्धेतील एका सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप 5 मधील भारताचा तिसरा गोलंदाज आहे. अर्शदने 1989 साली पाकिस्तान विरुद्ध 21 धावा देत 5 विकेट्स मिळवल्या होत्या.