WI vs IND : टीम इंडियाचा 26 बॉलमध्येच विजय, विंडीजचा 9 विकेट्सने धुव्वा, मुंबईकर सानिका चाळके चमकली

India Women U19 vs West Indies Women U19 Match Result : टीम इंडियाच्या महिला ब्रिगेडने अंडर 19 वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेत धमाकेदार सुरुवात केली आहे.

WI vs IND : टीम इंडियाचा 26 बॉलमध्येच विजय, विंडीजचा 9 विकेट्सने धुव्वा, मुंबईकर सानिका चाळके चमकली
Sanika Chalke And G Kamalini u 19 womens team india
Image Credit source: Icc
| Updated on: Jan 19, 2025 | 3:49 PM

निकी प्रसाद हीच्या नेतृत्वात अंडर 19 वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत अप्रतिम सुरुवात केली आहे. टीम इंडियाने विजयी सुरुवात केली आहे. महिला ब्रिगेडने वेस्ट इंडीजवर 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. विंडीजने विजयासाठी दिलेलं 45 धावांचं माफक आव्हान टीम इंडियाने 1 विकेट गमावून 94 बॉलआधीच पूर्ण केलं. टीम इंडियाने 4.2 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 47 धावा केल्या. टीम इंडियासाठी उपकर्णधार आणि मुंबईकर फलंदाज सानिका चाळके हीने सर्वाधिक धावा केल्या. तर जी कामालिनी हीने सानिकाला चांगली साथ दिली. या जोडीने टीम इंडियाला झटपट विजय मिळवून दिला.

टीम इंडियाची बॅटिंग

गोंगाडी तृषा हीने टीम इंडियाच्या डावातील पहिल्याच बॉलवर फोर ठोकून कडक सुरुवात करुन दिली. मात्र गोंगाडी दुसऱ्याच बॉलवर आऊट झाली. मात्र त्यानंतर जी कामालिनी आणि सानिका चाळके या दोघींनी 43 धावांची नाबाद आणि विजयी भागीदारी केली. सानिकाने 11 बॉलमध्ये 3 फोरसह नॉट आऊट 18 रन्स केल्या. तर कामालिनी हीने 13 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 16 धावांचं योगदान दिलं.

पहिल्या डावात काय झालं?

त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकला. कॅप्टन निकी प्रसाद हीने विंडीजला बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवत विंडीजला 13.2 ओव्हरमध्ये 44 धावांवर गुंडाळलं. विंडीजसाठी केनिका कॅसार हीने सर्वाधिक 15 धावा केल्या. तर असाबी कॅलेंडर हीने 12 धावांचं योगदान दिलं. एकूण 5 जणांना भोपळाही फोडता आला नाही. तर उर्वरित फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकले.

टीम इंडियाकडून पारुनिका सिसोदीया हीने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर जोशिथा व्ही जे आणि आयुषी शुक्ला या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर उर्वरित 3 विकेट्स या रन आऊटद्वारे मिळवल्या.

महिला ब्रिगेडची विजयी सलामी

अंडर 19 वूमन्स वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन : समारा रामनाथ (कर्णधार), असाबी कॅलेंडर, नैजान्नी कंबरबॅच, जहझारा क्लॅक्सटन, ब्रायना हॅरीचरण, केनिका कॅसार, अबीगेल ब्राइस, क्रिस्टन सदरलँड (विकेटकीपर), अमृता रामताहल, अमिया गिल्बर्ट आणि सेलेना रॉस.

अंडर 19 वूमन्स टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन: निकी प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके (उपकर्णधार), गोंगाडी तृषा, जी कामालिनी (विकेटकीपर), भाविका अहिरे, मिथिला विनोद, आयुषी शुक्ला, जोशिता वीजे, परुनिका सिसौदिया, शबनम एमडी शकील आणि सोनम यादव.