Team India : महिला ब्रिगेडचं वर्ल्ड कपच्या दिशेने एक पाऊल पुढे, सुपर 6 मध्ये या संघांचं आव्हान

Under 19 Womens T20 World Cup 2025 : अंडर 19 वूमन्स टीम इंडियाने साखळी फेरीत चमकदार कामगिरी केली. त्यानंतर आता महिला ब्रिगेड सुपर 6 साठी सज्ज झाली आहे. पाहा वेळापत्रक.

Team India : महिला ब्रिगेडचं वर्ल्ड कपच्या दिशेने एक पाऊल पुढे, सुपर 6 मध्ये या संघांचं आव्हान
u 19 womens team india
Image Credit source: bcci women X Account
| Updated on: Jan 23, 2025 | 10:09 PM

अवघ्या काही दिवसांनी 19 फेब्रुवारीपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला मलेशियात अंडर 19 वूमन्स टी 20i वर्ल्ड कपचा थरार रंगत आहे. या स्पर्धेत गतविजेत्या टीम इंडियाने आतापर्यंत धमाकेदार कामगिरी केली आहे. टीम इंडियाने निकी प्रसाद हीच्या नेतृत्वात सुपर 6 मध्ये धडक दिली आहे. टीम इंडियाने यासह वर्ल्ड कप ट्रॉफीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे. आता टीम इंडियान सुपर 6 फेरीत पुढच्या राउंडमध्ये पोहण्यासाठी 2 सामने खेळणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना महिला ब्रिगेडकडून सुपर 6 मध्येही साखळी फेरीपेक्षा सरस कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

टीम इंडियाची साखळी फेरीतील कामगिरी

टीम इंडियाने साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकत विजयी हॅटट्रिक केली. भारताने पहिले 2 सामने हे चेजिंग करताना जिंकले. तर तिसरा सामना हा भेदक बॉलिंगच्या जोरावर जिंकला. टीम इंडियाने विंडीजवर 9 विकेट्सने मात करत विजयी सलामी दिली. त्यानंतर 21 जानेवारीला यजमान मलेशियाचा 10 विकेट्सने धुव्वा उडवला. तर गुरुवारी 23 जानेवारीला श्रीलंकेवर 60 धावांनी विजय मिळवला.

सुपर 6 फेरीतील सामन्यांचं वेळापत्रक

वूमन्स टीम इंडियाचे सुपर 6 मध्ये 2 सामने होणार आहे. वूमन्स टीम इंडियासमोर बांग्लादेश आणि स्कॉटलँडचं आव्हान असणार आहे. वूमन्स टीम इंडियाचा सुपर 6 मधील सलामीचा सामना हा रविवारी 26 जानेवारीला होणार आहे. तर दुसरा आणि शेवटचा सामना हा मंगळवारी 28 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. आता महिला ब्रिगेड या फेरीत कशी कामगिरी करते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

वूमन्स टीम इंडियाची सुपर 6 मध्ये धडक, पहिला सामना केव्हा?

अंडर 19 वूमन्स टी 20i वर्ल्ड कप 2025 साठी टीम इंडिया : निकी प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके (उपकर्णधार), जी कमलिनी (विकेटकीपर), गोंगडी त्रिशा, मिथिला विनोद, भाविका अहिरे, आयुषी शुक्ला, जोशिता व्ही जे, पारुनिका सिसोदिया, शबनम एम डी शकील, वैष्णवी शर्मा, धृती केसरी आणि आनंद सोनम यादव.