Irani Cup: काय पेस आहे राव, Umran Malik च्या परफेक्ट यॉर्करवर बॅट्समनचं काय झालं? ते या VIDEO मध्ये पहा

Irani Cup: उमरान मलिकच्या आग ओकणाऱ्या गोलंदाजीसमोर प्रतिस्पर्धी टीमचं सरेंडर

Irani Cup: काय पेस आहे राव, Umran Malik च्या परफेक्ट यॉर्करवर बॅट्समनचं काय झालं? ते या VIDEO मध्ये पहा
umran-malik
Image Credit source: BCCI
| Updated on: Oct 02, 2022 | 3:37 PM

मुंबई: इराणी ट्रॉफीच्या पहिल्यादिवशी उमरान मलिकने आपल्या वेगाची ताकत दाखवून दिली. शेष भारत विरुद्ध सौराष्ट्र सामना सुरु आहे. उमरान मलिक रेस्ट ऑफ इंडियाकडून खेळतोय. उमरानने काल एकूण तीन विकेट घेतल्या. त्यातली पहिली विकेट त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये घेतली. उमरानने अर्पित वासावादा (22), जयदेव उनाडकट (12) आणि धर्मेंद्रसिंह जाडेजाला (26) आऊट केलं.

रेस्ट ऑफ इंडियाची जबरदस्त गोलंदाजी

5.5 ओव्हर्समध्ये त्याने 25 रन्समध्ये 3 विकेट काढल्या. रेस्ट ऑफ इंडियाच्या बॉलर्सनी जबरदस्त गोलंदाजी केली. त्यामुळे सौराष्ट्राचा डाव 98 धावात आटोपला. उमरान मलिक 10 व्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आला. तो पर्यंत सौराष्ट्राच्या चार विकेट गेल्या होत्या.

उमरानच्या चेंडूच काहीच उत्तर नव्हतं

उमरानसमोर लेफ्टी अर्पित वासावादा फलंदाजी करत होता. ओव्हरमधील तिसऱ्याच चेंडूवर उमरानने आपल्या इनस्विंगरवर वासावादाच्या बेल्स उडवल्या. त्यानंतर 16 व्या ओव्हरमध्ये आपल्या धारदार यॉर्करवर त्याने जयदेव उनाडकटला बोल्ड केलं. सौराष्ट्राचा कॅप्टन उनाडकटकडे उमरानच्या चेंडूच काहीच उत्तर नव्हतं.


सर्फराजची शतकी खेळी

उमरानच्या आधी मुकेश कुमारने आपल्या स्विंग गोलंदाजीने सौराष्ट्राला धक्के दिले. त्याने 10 ओव्हर्समध्ये 24 धावा देऊन 4 विकेट काढल्या. रेस्ट ऑफ इंडियाकडून सर्फराज खानने 138 धावांची शानदार खेळी साकारली.

रेस्ट ऑफ इंडियाच्या 18 धावात 3 विकेट होत्या, पण….

रेस्ट ऑफ इंडियाची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. 18 धावात 3 विकेट गेल्या होत्या. त्यानंतर सर्फराज खानने हनुमा विहारीसोबत मिळून डाव सावरला. पहिल्या दिवसअखेर रेस्ट ऑफ इंडियाच्या तीन बाद 205 धावा होत्या. हनुमा विहारी नाबाद 62 आणि सर्फराज खान नाबाद 125 धावांवर खेळत होता.