
Amazing Cricket Record: क्रिकेट इतिहास अनेक अजबगजब घटना घडल्या आहेत. त्याचे रेकॉर्ड पण आहेत. क्रिकेटप्रेमींमध्ये जेव्हा याची चर्चा होते तेव्हा एकच आश्चर्य व्यक्त होते. प्रत्येक सामन्यात काही ना काही घडते आणि इतिहासात त्याची नोंद होते. क्रिकेट जगतात भावांची जोडी प्रसिद्ध आहे. तर वडिलानंतर मुलगाही क्रिकेटमध्ये चमकल्याचेही उदाहरणं आहेत. क्रिकेटमध्ये चार वेळा असं झालं आहे की वडील आणि मुलाच्या जोडीने कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून नेतृत्व केलं आहे.
यादी भारतीय पिता-पुत्राची जोडी
वडिलानंतर मुलानं सुद्धा संघाचे नेतृ्त्व करण्याचा रेकॉर्ड भारतातही झाला आहे. या यादीत प्रसिद्ध खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये भारताचे इफ्तिखार अली खान पटोदी (नवाब पटोदी) आणि मन्सूर अली खान पटोदी (टायगर पटोदी) यांचा समावेश आहे.पण त्यांच्या पिढीतील सैफ अली खान हा मात्र चित्रपटसृष्टीत रमला. त्याने क्रिकेटमध्ये भविष्य आजमावले नाही.
फ्रँक मान आणि जॉर्ज मान
इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासात फ्रँक मान आणि त्यांचा मुलाग जॉर्ज मान यांनी असा विक्रम केला आहे. फ्रँक थॉमस मान यांनी इंग्लंडसाठी एकूण 5 कसोटी सामने खेळले आहेत. या सर्व सामान्यांचे नेतृत्व त्यांनी केले आहे.हे सामने 1922-23 मध्ये इंग्लंडच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्या दरम्यान खेळण्यात आले होते. त्यांचा मुलगा जॉर्ज मान यांनी इंग्लंडसाठी एकूण 7 कसोटी सामने खेळले. या सामन्यांचे त्यांनी नेतृत्व केले.
इफ्तिखार अली खान पटोदी आणि मन्सूर अली खान पटोदी
भारतीय क्रिकेटमधील या पिता-पुत्राच्या जोडीने कसोटीत भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. इफ्तिखार अली खान पटोदी यांनी भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघासाठी कसोटी सामने खेळले आहेत. त्यात भारतासाठी तीन तर इंग्लंडसाठी तीन टेस्ट मॅच खेळल्या आहेत. भारतीय संघाचे तीन ही कसोटीत त्यांनी नेतृत्व केले आहे. तर त्यांचा मुलगा मन्सूर अली खान पटोदी यांन एकूण 46 सामने खेळले. त्यातील 40 मध्ये त्यांनी संघाचे नेतृत्व केलं आहे.
कॉलिन काउड्रे आणि क्रिस काउड्रे
कॉलिन काउड्रे इंग्लंड क्रिकेटमधील एक महान खेळाडू होते. त्यांनी एकूण 114 कसोटी सामने खेळले तर त्यातील 27 सामन्यात त्यांनी संघाचे नेतृत्व केले. त्यांचा मुलगा क्रिस याने 6 कसोटीतील एकामध्ये नेतृत्व केले. कॉलिन हे प्रदीर्घ काळ कसोटीत खेळले. तर क्रिस यांना कसोटीत जास्त दिवस खेळता आले नाही.
एलिस्टेयर कॅपबेल आणि जोनाथन कॅपबेल
एलिस्टेयर कॅपबेल हे झिम्बाब्वेच्या इतिहासातील एक जबरदस्त क्रिकेटर होते. त्यांनी 60 कसोटी सामन्यांपैकी 21 सामन्यात संघाचं नेतृत्व केलं. तर त्यांचा मुलगा जोनाथन याने सुद्धा कसोटी मालिकेत संघाचे नेतृत्व केलं. विशेष म्हणजे या पिता-पुत्राने अनेकदा आंतरराष्ट्रीय सामन्यात देशाचं नेतृत्व केलं आहे.