WPL Auction : मॅन ऑफ द सिरीज असलेल्या दीप्ती शर्मावर बोली लावताना ट्विस्ट, दिल्लीने घेतलं पण…

वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेसाठी मेगा लिलाव सुरु आहे. या लिलावात खेळाडूंवर बोली लागत आहे. फ्रेंचायझी आपल्या आवश्यकतेनुसार खेळाडूंवर बोली लावताना दिसत आहेत. असं असताना दीप्ती शर्माला संघात घेताना एक ट्वीस्ट दिसून आला.

WPL Auction : मॅन ऑफ द सिरीज असलेल्या दीप्ती शर्मावर बोली लावताना ट्विस्ट, दिल्लीने घेतलं पण...
WPL Auction : मॅन ऑफ द सिरीज असलेल्या दीप्ती शर्मावर बोली लावताना ट्वीस्ट, दिल्लीने घेतलं पण...
Image Credit source: PTI
| Updated on: Nov 27, 2025 | 4:29 PM

वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेपूर्वी मेगा लिलावातून खेळाडूंसाठी बोली लावावी लागत आहे. काही खेळाडू रिटेन केल्यानंतर उर्वरित खेळाडूंवर या स्पर्धेत बोली लावली जात आहे. प्रत्येक फ्रेंचायझीला पाच खेळाडू रिटेन करण्याची मुभा होती. मात्र युपी वॉरियर्सने या मेगा लिलावापूर्वी फक्त एक अनकॅप्ड प्लेयर रिटेन केला आणि उर्वरित खेळाडूंना रिलीज केलं. रिलीज केलेल्या खेळाडूंमध्ये दीप्ती शर्माचही नाव होतं. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दीप्ती शर्मा वुमन्स ऑफ द सीरिज ठरली होती. तिच्या या कामगिरीमुळे तिला रिलीज करणं म्हणजे युपी वॉरियर्सने पायावर धोंडा मारल्याची भावना क्रीडाप्रेमींमध्ये होती. दीप्ती शर्मा या लिलावात 50 लाखांच्या बेस प्राईसवर उतरल होती. तिच्या नावाची घोषणा होताच तिच्यासाठी मोठी बोली लागणार याबाबत काही शंका नव्हती. पण तसं काही झालंच नाही.

दीप्ती शर्मावर कोणीच बोली लावत नसल्याचं पाहून दिल्ली कॅपिटल्सने आपला पेडल वर करत 50 लाखांवर घेण्याची तयारी दाखवली. त्यानंतर इतर कोणी बोली लावतो का? याकडे पाहिलं गेलं. वारंवार विचारणा केली गेली आणि कौल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला. पण युपी वॉरियर्सकडे राईट टू मॅच कार्ड आहे हे मात्र विसरले होते. त्यानंतर ट्विस्ट आला आणि युपी वॉरियर्सने आरटीएम कार्ड वापरलं आणि 3.20 कोटींची ऑफर दिल्ली कॅपिटल्सला दिली. मात्र ही ऑफर काही दिल्लीला परवडली नाही. त्यामुळे दीप्ती शर्मा युपी वॉरियर्सकडे कायम राहिली.

युपी वॉरियर्स मागच्या पर्वापर्यंत दीप्ती शर्माला 2.60 कोटी रुपये देत होती. आता ही रक्कम वाढली असून आता तिला 3.20 कोटी मिळणार आहे. मागच्या पर्वाच्या तुलनेत तिला 60 लाख रुपये अधिकचे मिळणार आहेत. दीप्ती शर्माने मागच्या तीन पर्वात युपी वॉरियर्सचं नेतृत्व केलं आहे. या लिलावात उतरण्यापूर्वी युपी वॉरियर्सकडे 14 कोटी 50 लाख होते. त्यापैकी 3.20 कोटी दीप्तीसाठी खर्च केले. त्यामुळे इतर खेळाडूंसाठी 11 कोटी 30 लाख रुपये आहेत.