Video: उर्विल पटेलने अर्धशतकी खेळी केल्यानंतर खिशातून चिठ्ठी काढली, काय लिहिलं होतं? जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेतील 53 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने लखनौ सुपर जायंट्सचा धुव्वा उडवला. या सामन्यात उर्विल पटेलने झंझावाती खेळी केली. त्याच्या आक्रमक खेळीमुळे चेन्नई सुपर किंग्सचा विजय सोपा झाला. त्यानंतर त्याने खिशातून एक चिठ्ठी काढली. त्यावर काय लिहिलं होतं?

Video: उर्विल पटेलने अर्धशतकी खेळी केल्यानंतर खिशातून चिठ्ठी काढली, काय लिहिलं होतं? जाणून घ्या
Video: उर्विल पटेलने अर्धशतकी खेळी केल्यानंतर खिशातून चिठ्ठी काढली, काय लिहिलं होतं? जाणून घ्या
Image Credit source: PTI
| Updated on: May 10, 2026 | 9:16 PM

आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने जबरदस्त कमबॅक केलं. सुरूवातीला पाच सामन्यात पराभव झाल्याने प्लेऑफच्या आशा मावळल्या होत्या. पण त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने जोरदार कमबॅक केलं. आतापर्यंत खेळलेल्या 11 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच 12 गुणांसह पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. आता उर्वरित तीन पैकी दोन सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफमधील स्थान पक्कं होईल. असं सर्व चित्र असताना लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात उर्विल पटेलच्या आक्रमक खेळीची चर्चा होत आहे. त्याने 23 चेंडूत 8 षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीने 65 धावांची खेळी केली. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 282.61 चा होता. तर त्याने 13 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्याने 384.62 स्ट्राईक रेटने अर्धशतकी खेळी केली. यानंतर त्याने खिशातून एक चिठ्ठी काढली आणि सर्वांना दाखवली. यावर वडिलांसाठी एक खास संदेश लिहिला होता.

उर्विल पटेलने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर पहिल्यांदा दोन हात जोडून देवाचे आभार मानले. त्यानंतर त्याने खिशात हात घातला आणि एक चिठ्ठी काढली. त्यावर ‘पप्पा हे तुमच्यासाठी आहे.’ असं लिहिलं होतं. त्यात उर्विलने गुजरातीत एक खास मेसेज लिहिला होता. या खेळीनंतर उर्विल पटेल म्हणाला की, ‘ माझ्या मनात काहीच नव्हतं, मला फक्त परिस्थिती आणि चेंडूनुसार फलंदाजी करायची होती. प्रशिक्षकांनी मला फक्त पाय स्थिर ठेवून फटका मारायला सांगितलं, आणि मी तसंच केलं. ऋतुराज म्हणाला की खेळपट्टी खाली झुकलेली आहे आणि त्यासाठी तयार राहा. त्याने मला जास्त काही सांगितलं नाही; त्याने मला माझा खेळ खेळू दिला.’

उर्विल पटेलच्या या खेळीचं आणि सेलिब्रेशनचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. आयपीएल स्पर्धेतील एक खास क्षण आहे. कारण मदर्स डेच्या दिवशी उर्विलने आपल्या वडिलांची आठवण काढली. गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील काहिपूर गावचा रहिवासी असलेल्या उर्विल पटेलचा क्रिकेट प्रवास हा त्याच्या वडिलांमुळे शक्य झाला. वडील मुकेश पटेल यांच्या अढळ विश्वासाचे आणि समर्पणाचे फळ आहे. त्याचे वडील शारीरिक प्रशिक्षण (पीटी) शिक्षक आणि माजी धावपटू होते.

Follow Us