Vaibhav Sooryavanshi: वय अवघं 15 वर्षं, पण पराक्रम थेट इतिहासात! वैभव सूर्यवंशीने 52 चेंडूंत ठोकलं द्विशतक, क्रिकेटविश्वाला हादरवलं

Vaibhav Sooryavanshi History with Double Century: सूर्यवंशीने अवघ्या 28 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले आणि 52 चेंडूंमध्ये द्विशतक पूर्ण केले. सूर्यवंशीने युएईविरुद्ध 53 चेंडूंमध्ये 204 धावा केल्या.

Vaibhav Sooryavanshi: वय अवघं 15 वर्षं, पण पराक्रम थेट इतिहासात! वैभव सूर्यवंशीने 52 चेंडूंत ठोकलं द्विशतक, क्रिकेटविश्वाला हादरवलं
aibhav Suryavanshi Stuns the Cricket World with a Record-Breaking Knock
| Updated on: Nov 24, 2026 | 5:32 PM

वैभव सूर्यवंशीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक असा विक्रम रचला आहे, जो कदाचित मोडणे अशक्य आहे. वैभव सूर्यवंशीने स्फोटक फलंदाजी करत द्विशतक झळकावले आहे. या 15 वर्षीय भारतीय फलंदाजाने अवघ्या 52 चेंडूंमध्ये 28 षटकार आणि 7 चौकार ठोकून द्विशतक पूर्ण केले. वयाच्या 15 व्या वर्षी 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये द्विशतक झळकावणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

वैभव सूर्यवंशीने अवघ्या 28 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. हा एकदिवसीय क्रिकेटमधील एक विश्वविक्रम आहे. वैभव सूर्यवंशीने 40 चेंडूंमध्ये 150 धावा केल्या, एकदिवसीय क्रिकेटमधील ही सर्वात जलद 150 धावांची नोंद आहे. वैभव सूर्यवंशीने अवघ्या 52 चेंडूंमध्ये द्विशतक झळकावले असून पन्नास षटकांच्या क्रिकेटमधील हे सर्वात वेगवान द्विशतक आहे.

Loading...

वैभव सूर्यवंशीने 52 चेंडूंमध्ये द्विशतक झळकावत, 103 चेंडूंमध्ये द्विशतक झळकावणाऱ्या न्यूझीलंडच्या चॅड बॉईसचा विक्रम मोडला आहे. व्यावसायिक क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक 28 षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. यापूर्वी हा विक्रम रणजी ट्रॉफीमध्ये अरुणाचलविरुद्ध 26 षटकार मारणाऱ्या तन्मय अग्रवालच्या नावावर होता. 2018 मध्ये डार्सी शॉर्टने लिस्ट ए च्या एका डावात 23 षटकार मारले होते. आता वैभव सूर्यवंशीने 28 षटकार मारून हा विक्रम मोडला आहे.

वैभव सूर्यवंशीने युएईच्या प्रत्येक गोलंदाजाला झोडपले. त्याने इब्रार अहमदला 13 चेंडूंमध्ये सहा षटकार आणि पाच चौकार ठोकले. त्याने झाहिद अलीविरुद्ध 14 चेंडूंमध्ये सहा षटकार आणि एक चौकार ठोकला. त्याने बासिल हमीदविरुद्ध 12 चेंडूंमध्ये सात षटकार ठोकले. त्याने उदिश सुरीविरुद्ध नऊ चेंडूंमध्ये सहा षटकार ठोकले. त्याने सिमरनजीत सिंगविरुद्ध पाच चेंडूंमध्ये तीन षटकार ठोकले.

दोहा येथे खेळल्या जात असलेल्या सामन्यात भारतीय संघासमोर 250 धावांचे लक्ष्य होते. प्रथम फलंदाजी करताना युएईने 50 षटकांत 8 गडी गमावून 249 धावा केल्या. हरप्रीत सिंग भाटियाने 144 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि 4 षटकार मारून संघासाठी 130 धावा केल्या. हरप्रीतच्या या खेळीमुळे संघाने 200 धावांचा टप्पा ओलांडला. याशिवाय, इतर कोणताही फलंदाज अर्धशतकही करू शकला नाही. या काळात अर्शद खानने भारतासाठी सर्वाधिक 4 बळी घेतले. उर्वरित फलंदाज हर्षित राणा, सूर्यांश शेडगे, हर्ष दुबे आणि शहबाज अहमद यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us