AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi : टीम इंडियात समावेश झाल्यावर वैभव सूर्यवंशीने केलं मोठं काम, पहिल्यांदाच…

IND A vs SL A: वैभव सूर्यवंशीने 'इंडिया ए' साठी श्रीलंकेविरुद्ध डंबुला येथे निर्णायक झेल पकडून आपल्या क्षेत्ररक्षणाची चुणूक दाखवली. टीम इंडियामध्ये निवड झाल्यानंतरचा हा त्याचा पहिला झेल होता, ज्याने सामन्याचे पारडे फिरवले.

Vaibhav Sooryavanshi : टीम इंडियात समावेश झाल्यावर वैभव सूर्यवंशीने केलं मोठं काम, पहिल्यांदाच...
वैभव सूर्यवंशीचं मोठं काम
| Updated on: Jun 10, 2026 | 1:52 PM
Share

IND A vs SL A: आयपीएलमध्ये तूफानी खेळी करून सर्वांचं लक्ष वेधून घेणारा खेळाडू म्हणजे वैभव सूर्यवंशी.. सध्या तो ‘इंडिया ए’ संघासोबत श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. तिथे ‘इंडिया ए’ आणि ‘श्रीलंका ए’ संघांसोबतच ‘अफगाणिस्तान ए’ संघाचाही समावेश असलेली तिरंगी एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना 9 जून रोजी डंबुला येथे ‘इंडिया ए’ आणि ‘श्रीलंका ए’ यांच्यात झाला. भारत ‘अ’ संघाने हा सामना 8 धावांनी जिंकला. वैभव सूर्यवंशीला या सामन्यात फलंदाजीत विशेष चमक दाखवता आली नसली तरीही त्याने श्रीलंकेत आपल्या चपळ क्षेत्ररक्षणाने छाप पाडली. भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर त्याने झेल टिपण्याची ही पहिलीच वेळ होती.

तूफान बॅट चालवणारा वैभव कॅच पकडण्यातही माहीर

श्रीलंकेत ‘इंडिया ए’ (India A) संघाकडून खेळणाऱ्या वैभवची 6 जून रोजी ‘टीम इंडिया’मध्ये निवड झाली. आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यासोबतच, आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या टी-20 संघातही त्याला स्थान मिळाले. त्याच्या निवडीपूर्वी त्याच्या फलंदाजीबाबत कोणतीही शंका नव्हती; मात्र, त्याच्या क्षेत्ररक्षणाबद्दल, विशेषतः झेल घेण्याच्या क्षमतेबद्दल—अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते.

मी वैभव सूर्यवंशीला कधीच कॅच पकडताना पाहिलं नाही, अशी कमेंट आयपीएल 2026 दरम्यान मोहम्मद कैफने केली होती. मात्र, त्याच्या या विधानानंतर काही काळानंतरच वैभवने आयपीएल मध्ये दोन झेल टिपले. आणि आता भारतीय संघात स्थान मिळवल्यानंतर, दांबुला येथे श्रीलंकेच्या ‘अ’ (Sri Lanka A) संघाविरुद्ध दबावाखाली त्याने घेतलेला झेल त्याची क्षमता दर्शवतो. तो केवळ फलंदाजी करून प्रतिस्पर्धी गोलंदाजांची दाणादाण उडवण्यातच नाही तर कॅच टिपून सामन्याचे पारडे फिरवण्यातही तितकाच कुशल आहे हे यावरून सिद्ध होतं.

टीम इंडियातील एंट्रीनंतर वैभवने पकडला पहिला कॅच

इंडिया ए च्या 277 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली श्रीलंकेच्या ‘ए’ संघाची सलामीची जोडी – निरोशन डिकवेला आणि अविष्का फर्नांडो – अधिकाधिक धोकादायक ठरत होती. 93 धावांची भागीदारी पूर्ण केल्यावर ही जोडी शतकी भागीदारीच्या दिशेने वाटचाल करत असल्यामुळे ‘इंडिया ए’ संघावर स्पष्टपणे दडपण आलं होतं. अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीत, पार्ट-टाइम गोलंदाज आयुष बदोनीच्या गोलंदाजीवर वैभवने अविष्का फर्नांडोचा जो झेल टिपला त्याने सामन्याचं पारडचं फिरलं. 6 जून रोजी ‘टीम इंडिया’मध्ये निवड झाल्यानंतर वैभव सूर्यवंशीने घेतलेला हा पहिलाच झेल ठरला आहे.

श्रीलंकेतही वैभवची क्रेझ

ज्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने 12 चेंडूंत 14 धावा केल्या, त्या सामन्यात त्याने श्रीलंकेच्या मैदानावर एक अप्रतिम झेल टिपून आपली छाप पाडली . एवढंच नव्हे तर मैदानाबाहेरही तो प्रचंड लोकप्रिय आहेय. श्रीलंकेत त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी लोकांची मोठी रांग पाहायला मिळाली.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा