Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी मित्राच्याच मार्गावर? IPL 2026 मधून ‘आऊट’?

RR vs SRH, IPL 2026: वैभव सूर्यवंशी याला सनराईजर्स हैदराबादविरोधातील सामन्यादरम्यान इजा झाली. ईशान किशनचा चेंडू अडवताना त्याला दुखापत झाली. त्याची अवस्था त्याच्या मित्रासारखीच झाली.

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी मित्राच्याच मार्गावर? IPL 2026 मधून आऊट?
वैभव सूर्यवंशी
Image Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: Apr 26, 2026 | 10:13 AM

Vaibhav Suryavanshi Injury Update: वैभव सूर्यवंशीने कालच्या सामन्यात डोळ्यांचं पारणं फेडलं. त्याच्या दमदार आणि दिमाखदार शतकानं क्रिकेट जगताला भुरळ पडली. अवघ्या 36 चेंडूत त्याने शतक ठोकले. पण वैभव सूर्यवंशी जयपूर येथील स्टेडियमवर फिल्डिंग करताना जायबंदी झाला. ईशान किशानने टोलावलेला चेंडू आडवताना त्याला दुखापत झाली. त्याला दोघांच्या मदतीने मैदानाबाहेर नेण्यात आले. वैभव सूर्यवंशी त्याचा मित्र आयुष्य म्हात्रे याच्यासारखीच झाली. म्हात्रे यांच्यासारखीच वैभव सूर्यवंशी सुद्धा IPL 2026 च्या बाहेर होणार का?

आयुष्य म्हात्रे का IPL 2026 बाहेर?

CSK चा दमदार फलंदाज आयुष म्हात्रे याला सनराईजर्स हैदराबादविरोधात दुखापत झाली होती. चेन्नई सुपर किंग्सच्या डावात खेळताना पाचव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर धाव घेताना हॅमस्ट्रिंगचा प्रकार झाला. ती कळ त्याला असह्य झाली. फिजिओथेरिपिस्टच्या मदतीने तो मैदानावर कायम होता. पण पुढील दोन चेंडूनंतर त्याच्या शरीराने उत्तर दिले. तो बाद झाला. त्याला मैदानाबाहेर नेण्यासाठी मदतनीस बोलावावे लागले. आयुष्य म्हात्रे याच्या शरीरावर गंभीर परिणाम पाहता, त्याला सक्तीचा आराम सांगण्यात आला. त्यामुळे आगामी कोणत्याही सामन्यात तो खेळू शकणार नाही. तो या आयपीएलच्या आगामी सामन्यात दिसणार नाही.

वैभव सूर्यवंशी सुद्धा आयपीएलच्या बाहेर?

Vaibhav Suryavanshi याला सुद्धा तशीच दुखापत झाल्याचे समजते. विशेष म्हणजे म्हात्रे याच्या सारखेच सनराईजर्स हैदराबादविरोधात तो सामना खेळत होता. एसआरएचच्या तिसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर क्षेत्ररक्षण करताना त्याला हॅमस्ट्रिंगचा सामना करावा लागला. ईशान किशनने टोलावलेला चेंडू आडवताना त्याला इजा झाली. शीर आकसल्यानंतर तो मैदानावरच कण्हत होता. त्याला वेदना झाल्या. फिजिओ तज्ज्ञ आले, पण त्याला चालणेही जड झाले होते. त्याला इतरांच्या मदतीने मैदानाबाहेर नेण्यात आले.

आता वैभव सूर्यवंशीच्या या दुखापतीचे कारण आणि त्याचे परिणाम समोर येतील. जर ही दुखापत आयुष्य म्हात्रे इतकीच गंभीर असेल तर कदाचित तो पुढील आयपीएल सामने खेळू शकणार नाही. त्यामुळे राजस्थान रॉयल्स संघासाठी एक मोठी समस्या उद्धभवेल. हा संघाला मोठा फटका असू शकतो. आता त्याच्या दुखापतीचा अहवाल समोर आल्यानंतर याविषयीचा निर्णय घेण्यात येईल.

Follow Us