वर्ल्ड कप मध्ये आमिर सोहेलला नडणारे हेच ते वेंकटेश प्रसाद? फोटो पाहून विश्वास नाही बसणार

| Updated on: Aug 17, 2022 | 4:27 PM

वर्ष 2007 मध्ये भारताने, पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेला टी 20 वर्ल्ड कप जिंकला. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चॅम्पियन बनली. टी 20 वर्ल्ड कप विजयाच्या त्या आठवणी आजही क्रिकेट चाहत्यांच्या स्मरणात ताज्या आहेत.

वर्ल्ड कप मध्ये आमिर सोहेलला नडणारे हेच ते वेंकटेश प्रसाद? फोटो पाहून विश्वास नाही बसणार
Venktesh prasad
Follow us on

मुंबई: वर्ष 2007 मध्ये भारताने, पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेला टी 20 वर्ल्ड कप (T 20 World cup) जिंकला. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चॅम्पियन बनली. टी 20 वर्ल्ड कप विजयाच्या त्या आठवणी आजही क्रिकेट चाहत्यांच्या स्मरणात ताज्या आहेत. एमएस धोनी,  (MS Dhoni) युवराज सिंह, गौतम गंभीर या युवा खेळाडूंना त्यावेळी विजयाचं श्रेय देण्यात आलं होतं. पण त्या ऐतिहासिक विजयात वेंकटेश प्रसाद यांचही योगदान तितकच महत्त्वाच होतं. वेंकटेश प्रसाद (venkatesh prasad) त्यावेळी टीमचे गोलंदाजी प्रशिक्षक होते. वेंकटेश प्रसाद भारताचे एक उत्तम क्रिकेटर आहेत. त्यांची कोचिंगही तितकीच जबरदस्त होती. आता हेच वेंकटेश प्रसाद एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत.

वेंकटेश प्रसाद यांना काय झालं?

वेंकटेश प्रसाद यांचा एक फोटो सध्या चर्चेमध्ये आहे. वेंकटेश प्रसाद यांनी स्वातंत्र्यदिनी एक फोटो पोस्ट केला. त्यात ते खूप बारीक झाल्याच दिसत आहे. वेंकटेश प्रसाद यांचा तो फोटो पाहून चाहत्यांना एकच धक्का बसला. टि्वटरवर फॅन्सनी प्रसाद यांच्या प्रकृतीची चौकशी केली. फोटोवर आलेल्या कमेंट पाहून प्रसाद यांनी सुद्धा त्यामागचं कारण सांगितलं.

वेंकटेश प्रसाद साधनेसाठी गेले होते

वेंकटेश प्रसाद यांनी एका युजरच्या टि्वटवर उत्तर देताना सांगितलं की, “साधना करत असल्यामुळे आपलं वजन कमी झालय. मी पूर्णपणे ठीक आहे. माझं स्वास्थ चांगलं आहे. मी तिरुवंदमलई मध्ये अरुणाचला पर्वताच्या परिक्रमेसाठी गेलो होतो. थोडं वजन कमी झालय. पण आतून मला खूप ऊर्जावान असल्याची अनुभूती होत आहे. मी लवकर वजन वाढवीन. काळजीने माझी विचारपूस केल्याबद्दल आपले आभार”

1996 वर्ल्ड कप मधली आमिर सोहेल बरोबरची ती फाईट

वेंकटेश प्रसाद आजही 1996 वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनल मॅचसाठी आठवतात. पाकिस्तान विरुद्धच्या या मॅच मध्ये आमिर सोहेलला दिलेलं उत्तर आजही चाहते विसरलेले नाही. या सामन्यात आधी आमिर सोहेलने वेंकटेश प्रसाद यांच्या चेंडूवर चौकार मारला व हाताने सीमारेषेकडे इशारा केला. त्यानंतर पुढच्या चेंडूवर प्रसाद यांनी त्याला क्लीन बोल्ड केलं व जशास तसं पॅव्हेलियनकडे जाण्याचा इशारा दिला. आजही तो किस्सा क्रिकेट रसिकांच्या स्मरणात आहे.