VIDEO: एकदम ‘कडक’, पाकिस्तानला हरवल्यानंतर झिम्बाब्वेमध्ये भारतासारखं सेलिब्रेशन

जनतेच्या आनंदाला उधाण, तुम्हाला सुद्धा हे सेलिब्रेशन पाहून झिम्बाब्वेच कौतुक वाटेल.

VIDEO: एकदम कडक, पाकिस्तानला हरवल्यानंतर झिम्बाब्वेमध्ये भारतासारखं सेलिब्रेशन
pak vs zim
Image Credit source: social media
| Updated on: Oct 28, 2022 | 1:10 PM

पर्थ: ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये दरदिवशी नवीन रोमांच अनुभवायला मिळतोय. धक्कादायक निकालाची नोंद होत आहे. काल पाकिस्तानला झटका बसला. सलामीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केलं होतं. काल झिम्बाब्वे सारख्या दुबळ्या टीमने पाकिस्तानला हरवलं. गुरुवारी पर्थमध्ये हा सामना झाला. झिम्बाब्वेच्या टीमने अवघ्या 1 रन्सने पाकिस्तानवर विजय मिळवला.

झिम्बाब्वेमध्ये उत्सवासारखा माहोल

झिम्बाब्वेच्या या विजयाने क्रिकेट विश्वाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. या विजयानंतर झिम्बाब्वेमध्ये उत्सवासारखा माहोल होता. फॅन्सनी नाचूक-गाऊन या विजयाच सेलिब्रेशन केलं.

सुपर 12 राऊंडमध्येच आव्हान संपुष्टात येणार?

पहिल्यांदा झिम्बाब्वेची टीम टी 20 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या राऊंडमध्ये पोहोचली आहे. 130 धावांच सोप लक्ष्य असूनही पाकिस्तानच पराभव झाला. मागच्यावर्षी बाबर आजमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचली होती. यावेळी सुद्धा त्यांची टीम सेमीफायनलसाठी दावेदार होती. पण आता सुपर 12 राऊंडमध्येच पाकिस्तानच आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झालीय.

हरारेमध्ये एकच जल्लोष

पाकिस्तनला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 3 धावांची गरज होती. शाहीन शाह आफ्रिदीने मिड ऑनच्या दिशेने शॉट मारला. दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला. मॅच टाय होऊ शकत होती. दुसरी धाव पूर्ण करण्याआधीच विकेटकीपरने त्याला रनआऊट केलं. झिम्बाब्वेने 1 रन्सने विजय मिळवला.


आफ्रिदी रनआऊट होताच, हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये उपस्थित फॅन्सनी एकच जल्लोष केला. झिम्बाब्वेच्या टीमलाही आपण विजय मिळवलाय, यावर विश्वास बसत नव्हता. ते सुद्धा आपला आनंद लपवू शकले नाहीत. त्यांनी सुद्धा स्टेडियममध्ये जल्लोष केला.