MUM vs KAR : मुंबई विरुद्ध कर्नाटक आमनेसामने, श्रेयस अय्यरला मिळणार सूर्याची साथ, सामना कुठे?

Mumbai vs Karnataka Vijay Hazare Trophy Live Streaming : विजय हजारे ट्रॉफीला 21 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत मुंबई आपला पहिलाच सामना हा कर्नाटकविरुद्ध खेळणार आहे.

MUM vs KAR : मुंबई विरुद्ध कर्नाटक आमनेसामने, श्रेयस अय्यरला मिळणार सूर्याची साथ, सामना कुठे?
mumbai team smat winner
Image Credit source: Ajinkya Rahane X Account
| Updated on: Dec 20, 2024 | 11:38 PM

मुंबई टीमने श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात अंतिम सामन्यात मध्य प्रदेशचा धुव्वा उडवत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीवर नाव कोरलं. त्यानंतर आता 21 डिसेंबरपासून विजय हजारे ट्रॉफी 2024-2025 स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेत एकूण 38 संघांमध्ये एकूण 135 सामने होणार आहेत. तसेच या 38 संघांना 5 गटात विभागण्यात आलं आहे. पहिल्या दिवशी एकूण 18 सामने होणार आहेत. मुंबई पहिल्या सामन्यात कर्नाटकविरुद्ध भिडणार आहेत. हा सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.

श्रेयस अय्यर हा मुंबईचं नेतृत्व करणार आहे. श्रेयसला सूर्यकुमार यादव, शार्दूल ठाकुर आणि शिवम दुबे या भारतीय संघातील अनुभवी खेळाडूंची साथ मिळणार आहे. तर मयंक अग्रवाल कर्नाटकाचं नेतृत्व करणार आहे.

मुंबई विरुद्ध कर्नाटक सामना केव्हा?

मुंबई विरुद्ध कर्नाटक सामना शुक्रवारी 21 डिसेंबरला होणार आहे.

मुंबई विरुद्ध कर्नाटक सामना कुठे?

मुंबई विरुद्ध कर्नाटक सामना नरेंद्र मोदी स्टेडियममधील बी ग्राउंड, अहमदाबाद येथे होणार आहे.

मुंबई विरुद्ध कर्नाटक सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

मुंबई विरुद्ध कर्नाटक सामन्याला सकाळी 9 वाजता सुरुवात होईल.

मुंबई विरुद्ध कर्नाटक सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

मुंबई विरुद्ध कर्नाटक सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर जिओसिनेमा एपवर सामना पाहता येईल.

विजय हजारे ट्रॉफीसाठी कर्नाटक संघ : मयंक अग्रवाल (कॅप्टन), श्रेयस गोपाल (उपकर्णधार), एस निकिन जोस, केवी अनीश, आर स्मरण, केएल श्रीजीत, अभिनव मनोहर, हार्दिक राज, विशाक विजयकुमार, वासुकी कौशिक, विद्याधर पाटील, किशन बेदारे, अभिलाष शेट्टी , मनोज भंडागे, प्रवीण दुबे आणि लवनिथ सिसोदिया.

विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबई सज्ज

विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबई टीम : श्रेयस लियर (कर्णधार), आयुष म्हात्रे, अंगकृष्ण रघुवंशी, जय बिस्ता, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, सिद्धेश लाड, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), प्रसाद पवार (विकेटकीपर), अथर्व अंकोलेकर, तनुष कोटीयन, शार्दूल ठाकुर, रोयस्टन डायस, जुनेद खान , हर्ष तन्ना आणि विनायक भोईर.