AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराटने केली श्रेयस अय्यरची नक्कल, रोहित शर्माला हसूच आवरेना…हा Video पाहून तुम्ही खळखळून हसणार

IND vs NZ ODI: भारत आणि न्यूझीलंडमध्ये तीन सामन्यांची एक दिवशीय मालिका सुरू आहे. या दरम्यान एक मजेदार व्हिडिओ समोर आला आहे. विराट कोहली श्रेयस अय्यरची नक्कल करताना दिसून आला. विराटची ही कृतीपाहून रोहित शर्माला सुद्धा हसू आवरले नाही. तुम्ही पाहिला का तो Viral Video?

विराटने केली श्रेयस अय्यरची नक्कल, रोहित शर्माला हसूच आवरेना...हा Video पाहून तुम्ही खळखळून हसणार
विराट कोहली, श्रेयस अय्यर, रोहित शर्मा, व्हायरल व्हिडिओImage Credit source: गुगल
| Updated on: Jan 15, 2026 | 4:08 PM
Share

Virat Kohli-Shreyas Iyer-Rohit Sharma Viral Video: भारत आणि न्यूझीलंड दरम्यान तीन सामन्यांची एकदिवशीय मालिका आता रोमांचक स्थितीत पोहचली आहे. पहिला एकदिवशीय सामना भारताने खिशात घातला. तर दुसर्‍या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. आता तिसरा आणि निर्णायक सामना 18 जानेवारी रोजी इंदूर येथे खेळला जाणार आहे. दरम्यान एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली हा श्रेयस अय्यर याच्या चालण्याची नक्कल करताना दिसतो. या दोघांचे मागे कर्णधार रोहित शर्मा हे दृश्य पाहताच खळखळून हसला. त्यावेळी चाहत्यांनी सुद्धा भरभरून दाद दिली. तर सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याची एकच चर्चा सुरू आहे.

सोशल मीडियावर मजेशीर प्रतिक्रिया

हा व्हिडिओ अनेक प्लॅटफॉर्मवर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक ठिकाणी हा व्हिडिओ शेअर झाला आहे. या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

एका चाहत्याने लिहिले आहे की, हा तर सरपंच साहेबांचा स्वॅग आहे. तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे की, विराट हा असाच आहे, तो काही सुधारणार नाही. विराटने आता मिमिक्रीचा क्लास सुरु करावा.

तर एकाने लिहिले आहे की, काही दिवसांपूर्वी तर श्रेयस ऐवजी रोहित पुढे होता आणि त्यावेळी सुद्धा असंच काहीसं झालं होते. कोहलीने हे सिद्ध केलंय की तो ऑलराऊंडर आहे.

तर एका फॅनने हा व्हिडिओ अत्यंत क्यूट असल्याचे म्हटलं आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. चाहते या व्हिडिओला लाईक करत आहेत. अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत.

मैदानावर विराट, ड्रेसिंग रुममध्ये कूल

विराट कोहली हा क्रिकेटच्या मैदानावर अत्यंत आक्रमक असतो. तो आक्रमक पद्धतीने खेळतो. पण ड्रेसिंग रुम आणि मैदानावर मात्र तो अत्यंत कूल दिसून येतो. त्याची फिरकी घेण्याची सवय दिसून येतो. तो वातावरण कूल ठेवण्याचं आणि सहकाऱ्यांशी थट्टा विनोद करताना दिसून येतो. सामना सुरू होण्यापूर्वी आणि संपल्यानंतर त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. तो वातावरण हलकं-फुलकं करताना दिसून येतो. त्याच्या याव्हिडिओमुळे सहकाऱ्यांमधील टीम स्पिरिट तर कायम राहतंच पण एक खास बाँडिंग पण तयार होतं. तर त्याचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर मनोरंजन करतात. सध्या हा व्हिडिओ असाच धुमाकूळ घालत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...