‘छी! तुझ्यामुळे माझी शांतता भंग…’ विराट कोहली संतापला अन् शोमधून थेट निघून गेला; पॉडकास्टमध्ये असं काय घडलं?

विराट कोहलीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ RCBच्या पॉडकास्टमधला असून या शोमध्ये विराट प्रचंड नाराज दिसला आणि तो थेट शोमधून उठून निघून गेला. पॉडकास्टमध्ये नक्की असं काय झालं?

छी! तुझ्यामुळे माझी शांतता भंग... विराट कोहली संतापला अन् शोमधून थेट निघून गेला; पॉडकास्टमध्ये असं काय घडलं?
Virat Kohli funny video with Mr Nags RCB IPL 2025
Image Credit source: tv9 hindi
| Updated on: Apr 19, 2025 | 2:58 PM

आयपीएलच्या या हंगामात विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. विराट सध्या आरसीबीसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरत आहे. चारही सामन्यात विराटने विजयासाठी महत्त्वाची भूमिका निभावली होती. मात्र आता विराट अजून एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. आरसीबीच्या नवीन शोमधील हा व्हिडिओ असून त्याचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विराट संतापलेला दिसून आलं.

शोमध्ये मिस्टर नॅग्स यांच्या एका कृतीमुळे विराट संतापला अन्….

शोमध्ये विराट कोहली ध्यान करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी “तुम्ही प्रेम करत असलेल्या व्यक्तीला तुमची कृपाळूवृत्ती दाखवा”, असं विराट कोहली म्हणताच शोमध्ये मिस्टर नॅग्स विराटला येऊन मिठी मारतात. यावेळी किंग कोहली चांगलाच संतापलेला दिसला तो थेट नॅग्सला बाजू करत म्हणतो, “अरे, जा आणि तिथे बसं”. मग त्यावर मिस्टर नॅग्स म्हणतात, “तूच म्हणाला होता की आपण प्रेम वाटावं”. यावर कोहली म्हणाला, “हो, ते शेअर करायला हवं पण आंघोळ केल्यानंतर”. “तू येताच माझी शांतता भंग झाली. तू असं आल्याने माझी शांतता भंग झाली. मला आता अंघोळीची गरज आहे” असं म्हणत विराटने कार्यक्रमातून काढता पाय घेतला.


संतापून विराट थेट शो सोडून निघून गेला 

लोकांना शांत करण्यासाठी कार्यक्रमात बोलव, असं विराट सल्ला देता देता गेला. विराट शांत हो, असं मिस्टर नॅग्सने म्हटलं. त्यानंतर विराट घंटे का पीस म्हणत कार्यक्रमातून निघून गेला. त्याआधी विराट कोहलीने आरसीबीच्या चाहत्यांना चिमटे काढले. त्याची देखील बरीच चर्चा होतान दिसत आहे.

विराटचा व्हिडीओ व्हायरल 

तसेच लोकांना शांत करण्यासाठी कार्यक्रमात बोलव, असा टोमना मारत खोचक सल्लाही विराट देताना दिसत आहे. त्यानंतर ‘विराट शांत हो’, असं मिस्टर नॅग्सने म्हटलं. त्यानंतर विराटने थोड्या संतापानेच एक वाक्य त्याच्याकडे पाहून म्हटलं”आणि तो थेट कार्यक्रमातून निघून गेला. RCBच्या पॉडकास्टमधील विराटचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडीओवर अनेक कमेंट्सही येत आहेत.