AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC FINAL 2023 : टीम इंडियाचा पराभव विराटच्या जिव्हारी, कसोटीमधून निवृत्ती घेण्याच्या तयारीत???

सलग दुसऱ्यांदा फायनल गाठूनही परत हार पदरी पडल्यामुळे सर्वजण निराश झाले आहेत. संघाच्या कर्णधारपदाच्या धुरी रोहित शर्माकडे असली तरीसुद्धा विराट कोहलीला हा पराभव जिव्हारी लागलेला दिसत आहे.

WTC FINAL 2023 : टीम इंडियाचा पराभव विराटच्या जिव्हारी, कसोटीमधून निवृत्ती घेण्याच्या तयारीत???
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jun 11, 2023 | 11:23 PM
Share

मुंबई :  टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली आज झालेल्या पराभवामुळे निराश झालेला दिसला. विराट कोहली कर्णधार असताना संघाने पहिल्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या पहिल्याच वर्षी फायनलमध्ये धडक घेतली होती. मात्र या सामन्यामध्ये न्यूझीलंड संघाने टीम इंडियाचा पराभव केला होता. आता सलग दुसऱ्यांदा फायनल गाठूनही परत हार पदरी पडल्यामुळे सर्वजण निराश झाले आहेत. संघाच्या कर्णधारपदाच्या धुरी रोहित शर्माकडे असली तरीसुद्धा विराट कोहलीला हा पराभव जिव्हारी लागलेला दिसत आहे.

काय आहे इन्स्टा स्टोरीमध्ये?

शांतता हे शक्तीचा सर्वोत्तम सोर्स असल्याचं विराट कोहली याने म्हटलं आहे. मैदानावर आपल्या आक्रमक शैलीसाठी  ओळखला जाणाऱ्या विराटने ठेवलेली इन्स्टा स्टोरीवर पाहून त्याच्या चाहत्यांना चिंता वाटू लागली आहे. विराट कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती तर घेण्याच्या तयारीत नाही ना? टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर विराट कोहली खूपच निराश दिसत होता. सोशल मीडियावर त्याचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत.

या सामन्यामध्ये विराट कोहली अपयशी ठरलेला दिसला. पहिल्या डावामध्ये त्याने 14 तर दुसऱ्या डावात 49 धाावा केल्या. रविवारी तर विराटने तीच चूक केली ज्यामुळे त्याला आपली विकेट गमवावी लागली. विराटची विकेट पडल्यावर टीम इंडिया काही स्थिरावली नाही आणि 234 वर ऑल आऊट झाली. कोहली कसोटी क्रिकेटमधूव निवृत्ती घेण्याच्या विचारात नाही ना असे अनेक सवाल चाहत्यांना पडले आहेत.

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया | पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मायकेल नेसर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.

WTC Final साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार

Follow Us
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी...
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पांचे दर्शन, पहा खास व्हिडीओ
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट; भाजपचा पलटवार!
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, ड्रोन...
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, पाहा ड्रोन दृश्य...
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुर
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुरांसाठी 25 हजारांची मागणी
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले...
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले यांचे मोठे विधान
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध...
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध पास असूनही पोलिसांची अडवणूक
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार, मुंबईला रवाना
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर भोजन...
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन अन् बाप्पाचे दर्शन
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह...
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह संध्याकाळी ७ वाजता उपस्थिती