यशस्वी जयस्वालला पाहताचा विराट कोहलीच्या अंगात भरलं वारं, भर मैदानात उडवली खिल्ली Video

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने 17 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात विजयाचा शिल्पकार ठरला तो विराट कोहली...या सामन्यातील एक क्लिप सध्या व्हायरल होत आहे. यात विराट कोहली यशस्वी जयस्वालची खिल्ली उडवताना दिसत आहे.

यशस्वी जयस्वालला पाहताचा विराट कोहलीच्या अंगात भरलं वारं, भर मैदानात उडवली खिल्ली Video
यशस्वी जयस्वालला पाहताचा विराट कोहलीच्या अंगात भरलं वारं, भर मैदानात उडवली खिल्ली Video
Image Credit source: Abhishek Chinnappa/Getty Images
| Updated on: Dec 01, 2025 | 4:58 PM

विराट कोहली मैदानात आपल्या बिनधास्त शैलीने सर्वांचं लक्ष वेधून घेतो. भारत दक्षिण अफ्रिकाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यापूर्वी असंच चित्र पाहायला मिळालं. विराट कोहली या सामन्यापूर्वी मस्तीच्या मूडमध्ये दिसला. या सामन्याच्या सुरुवातील सर्व खेळाडू सीमारेषेजवळ उभे होते. तेव्हा विराट कोहलीने आपल्या शैलीने सर्वांना खूश करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या रडारवर यशस्वी जयस्वालची हेअरस्टाईल होती.यशस्वी जयस्वालची हेअरस्टाईल सलमान खानच्या तेरे नाम चित्रपटातील राधे या भूमिकेशी मिळतीजुळती आहे. मधला भांग पाडला आणि लांब केस वाढवले की लोकांना डोळ्यासमोर पहिलं राधेचं कॅरेक्टर येतं. विराटने हाच धागा पकडून यशस्वी जयस्वालच्या हेअरस्टाईलची खिल्ली उडवली.यावेळी रोहित शर्मासह कुलदीप आणि ऋषभ पंत यांना हसू आवरलं नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

विराट कोहली यशस्वी जयस्वालच्या समोर उभा राहिला आणि नाचत त्याच्या केसांची खिल्ली उडवली. यशस्वीला पाहताच, कोहलीने अचानक “लगन लगी” गाण्यातील प्रसिद्ध स्टेपचे अनुकरण करायला सुरुवात केली. यावेळी यशस्वी जयस्वालही हसत होता. तर इतर खेळाडूही त्याची मजा घेत होते. काही मिनिटांतच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओखाली अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहे. काही प्रतिक्रिया मजेशीर आहेत.

यशस्वी जयस्वाल या सामन्यात काही खास करू शकला नाही. त्याने 16 चेंडूत दोन चौकार आणि 1 षटकार मारत 18 धावा केल्या. पण नांद्रे बर्गरच्या गोलंदाजीवर क्लिंटन डीकॉकने त्याचा झेल पकडला. दुसरीकडे विराट कोहलीने या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. त्याने 120 चेंडूत 11 चौकार आणि 7 षटकार मारत 135 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 112.50 चा होता.

विराट कोहलीने सामन्यानंतर सांगितलं की, “मी सध्या फक्त एकदिवसीय स्वरूपात खेळत आहे. सध्या मला सातत्यपूर्ण खेळ खेळायचा आहे.” विराट कोहली 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या तयारीला लागला आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी दीड वर्षांचा अवधी आहे. अशा स्थितीत स्वत:ला फिट अँड फाईन ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे.