Shubman gill : ‘सारा भाभी, सारा भाभी…’, Live मॅचमध्ये विराटने सुद्धा घेतली शुभमन गिलची मजा, VIDEO

| Updated on: Jan 26, 2023 | 1:46 PM

Shubman gill : शुभमन गिलचा विषय निघाला की, सारा तेंडुलकरच नाव येतच. मैदानात सामना सुरु असताना, प्रेक्षक शुभमन गिलची फिरकी घेत होते. फक्त प्रेक्षकच नाही, भारताचा स्टार बॅट्समन विराट कोहलीने सुद्धा प्रेक्षकांच्या या घोषणाबाजीवर रिएक्ट केलं.

Shubman gill : ‘सारा भाभी, सारा भाभी…, Live मॅचमध्ये विराटने सुद्धा घेतली शुभमन गिलची मजा, VIDEO
shubhaman-sara
Follow us on

इंदोर – टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये 3-0 ने क्लीन स्वीप केलं. शुभमन गिल टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने या सीरीजमध्ये एकूण 2 सेंच्युरीसह 360 धावा केल्या. गिलने पहिल्यांदा डबल सेंच्युरी झळकवली. त्यानंतर शेवटच्या तिसऱ्या वनडेमध्ये सुद्धा शतकी खेळी केली. या दोन्ही सामन्यात पूर्णवेळ गिलचीच चर्चा होती. गिलच्या बॅटिंगने प्रेक्षकांना खूश केलं. शुभमन गिलचा विषय निघाला की, सारा तेंडुलकरच नाव येतच. मैदानात सामना सुरु असताना, प्रेक्षक शुभमन गिलची फिरकी घेत होते. फक्त प्रेक्षकच नाही, भारताचा स्टार बॅट्समन विराट कोहलीने सुद्धा प्रेक्षकांच्या या घोषणाबाजीवर रिएक्ट केलं.

दोन ठिकाणी प्रेक्षकांकडून घोषणा

हैदराबाद आणि इंदोर वनडेमध्ये शुभमन गिलला पाहून प्रेक्षकांनी सारा भाभी, सारा भाभी अशा घोषणा द्यायला सुरुवात केल्या. तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाने रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या शतकाच्या बळावर 50 ओव्हर्समध्ये 9 बाद 385 धावा केल्या. त्यानतंर टीम इंडियाने 41.2 ओव्हर्समध्ये 295 धावांवर न्यूझीलंडचा डाव आटोपला. 90 रन्सनी टीम इंडियाने हा सामना जिंकला. भारताने श्रीलंकेनंतर न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीजमध्ये क्लीन स्वीप केलं.

कोहलीची मस्ती

भारताच्या प्रदर्शनाने प्रेक्षक खूश होते. गिलची फिरकी सुरु असताना कोहलीने सुद्धा मस्ती केली, त्यामुळे प्रेक्षकही हैराण झाले. मॅच दरम्यान काही प्रेक्षक गिलला पाहून सारा, सारा नावाने घोषणा दिल्या. शुभमन गिलच नाव मागच्या दोन-तीन वर्षांपासून सारा तेंडुलकरशी जोडलं जातय. दोघांपैकी कोणीही या नात्यावर कधीही अधिकृत भाष्य केलेलं नाही. सोशल मीडियावर या घोषणांचा व्हिडिओ व्हायरल होतोय.


नंबर वन टीम

इंदोरमधील विजयासह टीम इंडिया वनडे क्रिकेटमध्ये नंबर 1 टीम बनली आहे. टीम इंडियाचे एकूण 114 पॉइंट्स आहेत. गिलची बॅट या सीरीजमध्ये खूप चालली. पण कोहलीची बॅट फार गरजली नाही. त्याने 3 सामन्यात एकूण 55 धावा केल्या.

शुभमन गिलने सचिन आणि कोहलीमध्ये कोणाला निवडलं?

मॅचनंतर शुभमन गिलने सचिन तेंडुलकरची नाही, विराट कोहलीची सरस खेळाडू म्हणून निवड केली. सामन्यानंतर एका इंटरव्यूमध्ये गिलला कोहली आणि तेंडुलकरमध्ये सर्वोत्तम खेळाडू निवडण्यास सांगितलं. गिलने कोहलीची निवड केली. यामागच कारणही त्याने सांगितलं. क्रिकेटमध्ये कोहलीमुळे इंटरेस्ट वाढल्याच शुभमनने सांगितलं. पण वडिलांनी सचिनच्या प्रभावामुळेच त्याला नेटमध्ये पाठवलं.