शुभमन गिलच्या बहिणीने शेअर केले ग्लॅमरस फोटो; सारा तेंडुलकरने दिली अशी रिॲक्शन

स्वाती वेमूल, Tv9 मराठी

Updated on: Jan 23, 2023 | 1:43 PM

गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटर शुभमन गिल आणि सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर चर्चेत आहेत. हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत का, अशी चर्चा होती.

शुभमन गिलच्या बहिणीने शेअर केले ग्लॅमरस फोटो; सारा तेंडुलकरने दिली अशी रिॲक्शन
Sara Tendulkar and Shahneel Gill
Image Credit source: Instagram

मुंबई: क्रिकेटर्स आणि सेलिब्रिटींमधील खास नातं नेहमीच पहायला मिळालं. अनेक बरेच क्रिकेटर्स आहेत ज्यांनी अभिनेत्रींशी लग्न केलं. तर काही क्रिकेटर्सचं नाव ग्लॅमर विश्वाशी जोडलं गेलं. गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटर शुभमन गिल आणि सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर चर्चेत आहेत. हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत का, अशी चर्चा होती. मात्र त्या चर्चांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं स्पष्ट झालं. असं असलं तरी शुभमनच्या बहिणीसोबत साराची चांगली मैत्री आहे. शुभमनची बहीण शाहनील गिल ही इन्स्टाग्रामवर तिचे बरेच फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. नुकत्याच तिच्या काही ग्लॅमरस फोटोंवर साराने प्रतिक्रिया दिली आहे.

शाहनीलने ब्लॅक क्रॉप टॉप आणि मिनी स्कर्ट परिधान करत ग्लॅमरस अंदाजातील हे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंना सारा तेंडुलकरने लाइक केलं आहे. शाहनील तिच्या फॅशन सेन्समुळे नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. इन्स्टाग्रामवर तिचे 50 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

शुभमन आणि सारा हे सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करत नाहीत. या दोघांनी कधी एकमेकांच्या पोस्टवर प्रतिक्रियाही दिली नाही. मात्र शाहनील आणि साराची चांगली मैत्री असल्याचं दिसतंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shahneel Gill (@shahneelgill)

शुभमनचं नाव अभिनेत्री सारा अली खानशीही जोडलंं गेलं आहे. या दोघांना एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र पाहिलं गेलं होतं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

‘दिल दिया गल्ला’ या पंजाबी चॅट शोमध्ये शुभमनला सारा अली खानला डेट करण्याविषयी प्रश्न विचारला गेला. तुझ्या मते बॉलिवूडमधील सर्वांत फिट अभिनेत्री कोणती, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना शुभमनने लगेच साराचं नाव घेतलं.

साराचं नाव घेतल्यानंतर त्याला डेटिंगविषयी पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, “कदाचित”. ‘सारा का सारा सच बोलो’, असं सूत्रसंचालकाने बोलल्यावर शुभमनच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं होतं. “सारा दा सारा सच बोल दिया.. कदाचित हो, कदाचित नाही”, असं त्याने पुढे सांगितलं होतं.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI