AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साराला डेट करण्याच्या चर्चांवर अखेर शुभमन गिलने सोडलं मौन

सारासोबत अफेअरच्या चर्चांदरम्यान शुभमनने दिली मोठी हिंट

साराला डेट करण्याच्या चर्चांवर अखेर शुभमन गिलने सोडलं मौन
Shubman Gill and Sara Ali KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 15, 2022 | 12:32 PM
Share

मुंबई- अभिनेत्री सारा अली खान आणि क्रिकेटर शुभमन गिल यांच्यात काहीतरी शिजत असल्याची चर्चा गेल्या बऱ्याच दिवसांपासून आहे. या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय. मात्र हे दोघं खरंच एकमेकांना डेट करत आहेत का, हे मात्र स्पष्ट होऊ शकलं नव्हतं. आता या चर्चांवर खुद्द शुभमनने मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याला साराबद्दल प्रश्न विचारण्यात आलं होतं.

शुभमन साराला खरंच डेट करतोय का?

‘दिल दिया गल्ला’ या पंजाबी चॅट शोमध्ये शुभमनने पाहुणा म्हणून हजेरी लावली होती. सोनम बाजवा या शोचं सूत्रसंचालन करते. तुझ्या मते बॉलिवूडमधील सर्वांत फिट अभिनेत्री कोणती, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना शुभमनने लगेच साराचं नाव घेतलं.

साराचं नाव घेतल्यानंतर त्याला डेटिंगविषयी पुढचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, “कदाचित”. ‘सारा का सारा सच बोलो’, असं सूत्रसंचालकाने बोलल्यावर शुभमनच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. “सारा दा सारा सच बोल दिया.. कदाचित हो, कदाचित नाही”, असं त्याने पुढे सांगितलं.

शुभमनच्या या उत्तरानंतर सारा आणि त्याच्यात नक्कीच काहीतरी शिजत असल्याची प्रतिक्रिया नेटकरी सोशल मीडियावर देत आहेत. त्याने स्पष्ट होकार दिला नसला तरी स्पष्ट नकारसुद्धा दिला नाही, असंही चाहते म्हणत आहेत.

या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून सारा आणि शुभमनच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं. या दोघांना एकत्र एका रेस्टॉरंटमध्ये पाहिलं गेलं होतं. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पुन्हा एकदा हे दोघं एकत्र दिसले. दिल्लीच्या एका हॉटेलमधून बाहेर पडताना या दोघांना पाहिलं गेलं.

याआधी साराचं नाव सुशांत सिंह राजपूत आणि कार्तिक आर्यन यांच्याशीही जोडलं गेलं होतं. 2018 मध्ये जेव्हा साराने ‘कॉफी विथ करण’मध्ये हजेरी लावली होती, तेव्हा तिने कार्तिक आर्यनवर क्रश असल्याचा खुलासा केला होता. ‘लव्ह आज कल’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. 2020 मध्ये कार्तिक आणि साराचं ब्रेकअप झालं.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.