
टीम इंडियाची रनमशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहली याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही झंझावात कायम राखला आहे. विराटने सलग दुसरं शतक ठोकसं आहे. विराटने रांचीनंतर रायपूरमध्येही शतक झळकावलं. टीम इंडियाच ओपनर रोहित शर्मा लवकर आऊट झाल्यांनतर विराट तिसऱ्या स्थानी बॅटिंगसाठी आला. विराटने यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांच्यासह भागीदारी करत शतक झळकावलं. विराटने या शतकासह खास विक्रम आपल्या नावावर केला. विराट एकाच स्थानी खेळताना सर्वाधिक शतकं करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. विराटने यासह भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
दक्षिण आफ्रिकेने सलग दुसर्या सामन्यात नाणेफेक जिंकत भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. रोहित आणि यशस्वी या सलामी जोडीने 40 धावा जोडल्या. त्यानंतर रोहित आऊट झाला. रोहितनंतर विराट मैदानात आला. त्यानंतर यशस्वी टीम इंडियाच्या 62 रन्स असताना आऊट झाला. टीम इंडियाची सलामी जोडी आऊट झाल्याने विराटवर पुन्हा एकदा जबाबदारी आली. विराटने ऋतुराज याच्यासह तिसऱ्या विकेटसाठी 195 धावांची मोठी भागीदारी केली. या भागीदारीमुळे टीम इंडिया भक्कम स्थितीत पोहचली.
विराटने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना संधी मिळेल तेव्हा मोठे फटके मारले. विकाटने 47 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. विराटने अर्धशतकानंतरही फटकेबाजी कायम ठेवली. विराटने फटकेबाजी करत शतकापर्यंत मजल मारली. विराटने यासह एकदिवसीय क्रिकेटमधील 53 वं शतक पूर्ण केलं.
विराटला ही खेळी आणखी मोठी करण्याची संधी होती. विराटला सहज दीडशतक करण्याची संधी होती. मात्र विराट शतकानंतर आऊट झाला. विराटने 93 बॉलमध्ये 102 रन्स केल्या. विराटने या शतकासह काही खास विक्रम आपल्या नावावर केले.
सचिनने ओपनर म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 45 शतकं झळकावली होती. तर विराटने तिसऱ्या स्थानी बॅटिंग करत 46 वं एकदिवसीय शतक पूर्ण केलं. विराट यासह एका स्थानी खेळताना सर्वाधिक शतकं करणारा पहिला फलंदाज ठरला.
तसेच विराट वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक 11 वेळा सलग 2 किंवा त्यापेक्षा अधिक शतक झळकावणारा फलंदाज ठरला. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डी व्हीलियर्स दुसर्या स्थानी आहे. एबीने 6 वेळा सलग 2 शतकं झळकावली होती.