AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियातून डावललं, आता विदेशी संघातून खेळण्यास सज्ज

आशिया कप स्पर्धेत संघात स्थान न मिळाल्याने भारतीय खेळाडूने मोठा निर्णय घेतला आहे. आता हा भारतीय खेळाडू विदेशी संघात खेळताना दिसणार आहे. नुकतंच इंग्लंड दौऱ्यात त्याने चांगली कामगिरी केली होती. पण आशिया संघात स्थान मिळालं नाही.

आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियातून डावललं, आता विदेशी संघातून खेळण्यास सज्ज
आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियातून डावललं, आता विदेशी संघातून खेळण्यास सज्जImage Credit source: PTI
| Updated on: Sep 11, 2025 | 5:15 PM
Share

भारतीय संघ आशिया कप स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहे. पहिल्याच सामन्यात युएई संघाला दिवसा तारे दाखवले. भारताने हा सामना 9 गडी राखून अवघ्या 27 चेंडूत संपवला. आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाची विजयी आगेकूच सुरु असताना भारताच्या एका खेळाडूने मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा असल्याने त्याला संघात काही स्थान मिळालं नाही.  त्यामुळे त्याला आता काही काळ वाट पाहावी लागणार आहे. लवकरच हा खेळाडू विदेशी संघातून खेळतानी दिसू शकतो. आशिया कप 2025 स्पर्धेतून या खेळाडूला डावलण्यात आलं आहे. त्यानंतर त्याने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर आहे. त्याने इंग्लंडच्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये शेवटच्या दोन फेरीत हॅम्पशरकडून खेळण्याची तयारी दर्शवली आहे. हॅम्पशरने सोशल मीडियावर एक पोस्ट करून याची माहिती दिली आहे.

वॉशिंग्टन सुंदर नुकताच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाचा भाग होता. या दौऱ्यात त्याने चमकदार कामगिरी केली होती. 47 च्या सरासरीने 284 धावा केल्या होत्या. यात ओल्ड ट्रॅफर्ड येथे ठोकलेल्या शतकाचाही समावेश आहे. तसेच त्याने गोलंदाजीतही कमाल केली होती. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर हॅम्पशरने त्याच्यासाठी संपर्क साधला असावा यात काही शंका नाही. हॅम्पशर 15 ते 18 सप्टेंबर दरम्यान कूपर असोसिएट्स काउंटी ग्राउंड, टॉनटनमध्ये समरसेटविरुद्ध सामना खेळेल. त्यानंतर 24 ते 27 सप्टेंबर दरम्यान युटिलिटा बाउलमध्ये चॅम्पियन सरेशी भिडेल. वॉशिंग्टन सुंदर या दोन्ही सामन्यात खेळणार आहे.

वॉशिंग्टन सुंदर 2022 नंतर पहिल्यांदाच काउंटी क्रिकेट खेळणार आहे. यापूर्वी काउंटी चॅम्पियनशिप आणि वनडे कपमध्ये लंकाशरकडून खेळला आहे. त्याने नॉर्थम्पटनशरविरुद्ध पहिल्या सामन्यात 5 विकेट घेतले होते. वॉशिंग्टन सुंदर भारताकडून 13 कसोटी सामने खेळला आहे. त्याने 44.2 च्या सरासरीने 752 धावा केल्या आहेत. यावेळी त्याने 1 शतक आणि 5 अर्धशतकं ठोकली आहे. त्याने 28.5 च्या सरासरीने 32 विकेट घेतल्या आहे. यात तीन वेळा 4 विकेट आणि एकदा पाच विकेट घेण्याचा विक्रम नोंदवला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळेल की नाही? हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना