AUS vs IND Toss : टीम इंडियाने टॉस जिंकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॅटिंग

Australia Women vs India Women 1st ODI Toss : हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात वूमन्स टीम इंडियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात टॉस जिंकला आहे. टीम इंडिया पहिले बॅटिंग करणार आहे.

AUS vs IND Toss : टीम इंडियाने टॉस जिंकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॅटिंग
waus vs wind 1st odi toss update
Image Credit source: bcci women X Account
| Updated on: Dec 05, 2024 | 9:54 AM

मेन्स टीम इंडिया बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना हा 6 डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. तर दुसऱ्या बाजूला भारतीय महिला क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला आज 5 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. वूमन्स इंडिया या दौऱ्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. ही मालिका आयसीसी चॅम्पियन्शीप मॅच अंतर्गत खेळवण्यात येत आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा अॅलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन येथे आयोजित करण्यात आली आहे.

पहिल्या एकदिवसीय सामन्याला भारतीय वेळेनुसार 9 वाजून 50 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 9 वाजून 20 मिनिटांनी टॉस झाला. भारतीय कर्णधार हरमनप्रीत हीने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईली. तर मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवरुन मॅच पाहायला मिळेल.

तितास साधूचं पदार्पण

टीम इंडियाकडून या मालिकेतील सलामीच्या सामन्यातून एका खेळाडूचं पदार्पण झालं आहे. तितास साधू हीला एकदिवसीय पदार्पणाची संधी टीम मॅनजमेंटने दिली आहे. टीम इंडियाला या 20 वर्षीय युवा खेळाडूने तिच्या एकदिवसीय कारकीर्दीची अविस्मरणीय सुरुवात करावी, अशी अपेक्षा टीम मॅनेजमेंट आणि कुटुंबियांना असणार आहे. त्यामुळे तितास या सामन्यात कशी कामगिरी करते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल

वूमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कर्णधार), प्रिया पुनिया, स्मृती मानधना, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, तीतास साधू, प्रिया मिश्रा, सायमा ठाकोर आणि रेणुका ठाकूर सिंग.

वूमन्स ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : ताहलिया मॅकग्रा (कॅप्टन), फोबी लिचफील्ड, जॉर्जिया वॉल, एलिस पेरी, बेथ मूनी (विकेटकीपर), ॲनाबेल सदरलँड, ॲशले गार्डनर,जॉर्जिया वेरेहम, अलाना किंग, किम गर्थ आणि मेगन शूट.