
वुमन्स बिग बॅश लीग 2025-2026 स्पर्धेत एडिलेड स्ट्रायकर्स आणि सिडनी थंडर हे दोन संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात सिडनी थंडरचा विजय जवळपास पक्का होता. पण नशिबाने विजयाची घास हिरावून घेतला. त्यामुळे या क्रिकेट सामन्यात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. पंचांनी पावसाच्या कारणामुळे हा सामना रद्द केल्याचं सांगितलं. खरं तर 13 चेंडूत 3 धावांची गरज होती आणि हा सामना सहज जिंकता आला असता. पण पंचांच्या निर्णयामुळे सिडनी थंडरच्या पदरी निराशा पडली. या सामन्यात वारंवार पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे हा सामना 5-5 षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेतला गेला. एडिलेट ओव्हलवर खेळल्या गेलेल्या सामन्यात स्ट्रायकर्सने प्रथम फलंदाजी करताना 5 षटकात 2 गडी गमवून 45 धावा केल्या. लॉरा वॉल्वार्टने स्ट्रायकर्सकडून खेळताना 13 चेंडूत 22 धावांची खेळी केली. यात दोन चौकार आणि एक षटाकर मारला. तर कर्णधार ताहलिया मॅक्ग्राने 6 चेंडूत 12 धावा केल्या.
विजयासाठी दिलेल्या 45 धावांचा पाठलाग करताना सिडनी थंडरने आक्रमक सुरुवात केली. पहिल्या षटकात 13 काढल्या. पावसाची रिपरिप सुरु होती. दुसरीकडे, धावांचा वर्षाव सुरु होता. या सामन्यात फोएबे लिचफिल्डने 15 चेंडू नाबाद 38 धावा काढल्या. यात पाच चौकार मारले. तिने डार्सी ब्राऊनच्या एकच षटकात सलग चार चौकार मारले. सिडनी थंडरने तिसऱ्या षटकात बिनबाद 43 धावा केल्या होत्या आणि विजयासाठी फक्त 3 धावांची गरज होती. त्यामुळे विजय पक्का होता. मात्र सामन्यात ट्विस्ट आला आणि रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला.
लिचफिल्डने सामना रद्द झाल्यानंतर निराशा व्यक्त केली आणि म्हणाली, “खूप निराशा झाली. हे खूप वाईट आहे.” दरम्यान, स्ट्रायकर्सची कर्णधार ताहलिया मॅकग्रा म्हणाली, “कठीण निर्णय. पाऊस थांबला होता, पण चेंडू निसरडा झाला होता. पंचांनी योग्य निर्णय घेतला.”
Nooooo way!
In a five-over game, the Thunder needed three more runs to win off 13 balls…
And umpires call for the covers with rain no heavier than it had been in the previous 15 minutes, per @TheoDrop.
Game called off, no result 🫣#WBBL11 pic.twitter.com/b24oi9XmsF
— 7Cricket (@7Cricket) November 28, 2025
“It’s an embarrassment and they could have done things a lot better than we have (seen) tonight.” – Katey Martin
“That is an utter embarrassment that’s taken place.” – Alister Nicholson
“It’s actually embarrassing for the game.” – Callum Ferguson
– On tonight’s finish #WBBL11 pic.twitter.com/qjPxQ4qTYd
— 7Cricket (@7Cricket) November 28, 2025
एडलेड स्ट्रायकर्स महिला (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड, टॅमी ब्यूमोंट, मॅडलिन पेन्ना, ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), ब्रिजेट पॅटरसन (यष्टीरक्षक), एली जॉन्स्टन, अमांडा-जेड वेलिंग्टन, सोफी एक्लेस्टोन, जेम्मा बार्सबी, तबाथा सॅव्हिल, डार्सी ब्राउन.
सिडनी थंडर महिला (प्लेइगं इलेव्हन): जॉर्जिया वोल, ताहलिया विल्सन (विकेटकीपर), फोबी लिचफिल्ड (कर्णधार), हीदर नाइट, चामारी अथापथ्थू, अनिका लिरॉयड, लॉरा हॅरिस, लुसी फिन, तानेल पेशेल, शबनीम इस्माइल, सामंथा बेट्स.