5 सिक्स-4 फोर, Yuvraj Singh पेटला, कांगारुंना झोडला, पाहा व्हीडिओ

Yuvraj Singh Fifty: युवराज सिंहने ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स विरुद्ध झंझावाती अर्धशतकी खेळी केली. युवराजने या खेळीत चौफेर फटकेबाजी केली.

5 सिक्स-4 फोर, Yuvraj Singh पेटला, कांगारुंना झोडला, पाहा व्हीडिओ
yuvraj singh wcl semi final
| Updated on: Jul 13, 2024 | 12:49 AM

इंडिया चॅम्पियन्स टीमचा कॅप्टन युवराज सिंह याने वर्ल्ड चॅम्पियनशीप लीग 2024 स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध विस्फोटक खेळी केली आहे. युवराजने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. ओपनर रॉबिन उथप्पाने अंबाती रायुडू याच्यासह इंडियाला आश्वासक सुरुवात करुन दिली. मात्र त्यानंतर रायुडू आणि सुरेश रैना झटपट आऊट झाले. रायुडूने 14 आणि रैनाने 5 धावा केल्या. त्यानंतर उथप्पा आणि युवराजने तिसऱ्या विकेटसाठी 37 बॉलमध्ये 47 धावा केल्या. उथप्पा 35 बॉलमध्ये 65 धावांवर आऊट झाला. त्यामुळे इंडियाचा स्कोअर 3 आऊट 103 असा झाला.

त्यानंतर युवराजने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेत दांडपट्टा सुरु केला. युवराजने कर्णधार म्हणून विस्फोटक बॅटिंगला सुरुवात केली. युवराजने चौफेर फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना झोडून काढला. युवराजने संधी मिळेल तेव्हा मर्जीनुसार वाटेल तिथे मोठे मोठे फटके मारले. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना अनेक वर्षांनी पुन्हा एकदा तोच आधीच युवराजचं दर्शन झालं. युवराजने अवघ्या 26 बॉलमध्ये 203. 85 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक पूर्ण केलं. युवराजच्या या अर्धशतकी खेळीत, 4 चौकार आणि 4 षटकार ठोकले. युवराज ज्या पद्धतीने खेळत होता त्यानुसार तो शतक ठोकेल, असं वाटत होतं. मात्र युवराज अर्धशतकानंतर 2 चेंडू खेळून आऊट झाला.युवराजने 5 खणखणीत षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 210.71 स्ट्राईक रेटसह 59 धावांची खेळी केली. मात्र युवराजने त्याच्या तडाखेदार खेळीने क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली.

युवराज सिंहची  विस्फोटक खेळी


इंडिया चॅम्पियन्स प्लेइंग ईलेव्हन: युवराज सिंग (कॅप्टन), रॉबिन उथप्पा (विकेटकीपर), गुरकीरत सिंग मान, सुरेश रैना, अंबाती रायडू, युसूफ पठाण, इरफान पठाण, पवन नेगी, विनय कुमार, हरभजन सिंग आणि धवल कुलकर्णी.

ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स प्लेइंग ईलेव्हन : ब्रेट ली (कॅप्टन), आरोन फिंच, कॅलम फर्ग्युसन, बेन कटिंग, डॅनियल ख्रिश्चन, टिम पेन (विकेटकीपर), बेन डंक, बेन लॉफलिन, पीटर सिडल, झेवियर डोहर्टी आणि नॅथन कुल्टर-नाईल.