AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र हादरला! आई-वडील मजूरीसाठी जाताच 10 वर्षांच्या मुलीने स्वत:ला संपवले, काळीज पिळवटून टाकणारी घटना

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली. एका 10 वर्षांच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादला आहे. आता तिने नेमकं हे पाऊल का उचलले याचा तपास पोलीस घेत आहेत.

महाराष्ट्र हादरला! आई-वडील मजूरीसाठी जाताच 10 वर्षांच्या मुलीने स्वत:ला संपवले, काळीज पिळवटून टाकणारी घटना
Nashik CrimeImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 08, 2025 | 3:28 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून राज्यात आत्महत्येची प्रकरणे सतत कानावर येत आहेत. आता महाराष्ट्रातील नाशिक येथील सामनगाव येथे राहणाऱ्या 10 वर्षांच्या मुलीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण राज्य हादरुन गेले आहे. मुलीने फाशी घेत स्वत:ला संपवले. आता नेमकं काय झालं? याचा तपास पोलीस करत आहेत. घटना घडली तेव्हा मुलीचे आई-वडील मजुरी करण्यासाठी गेले होते.

सामनगाव येथील १० वर्षीय चिमुकलीची हृदय पिळवटून टाकणारी घटना

नाशिक तालुक्यातील सामनगाव येथे राहणारी १० वर्षांची मुलगी घरी एकटीच होती. तिचे आई-बाबा रोजंदारी मजुरीसाठी गेले होते. त्याचवेळी तिने घरातल्या नायलॉनच्या दोरीने छताला गळफास लावून घेतला. परत आलेल्या नातेवाईकांनी तिला बेशुद्धावस्थेत पाहिले आणि तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, नंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर या प्रकरणाची माहिती पोलीसांना देण्यात आली.

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

पोलिसांनी सांगितले की, मुलीने आत्महत्या का केली याचे अद्याप कोणतेही स्पष्ट कारण समोर आलेले नाही. सुसाईड नोट सापडलेली नाही आणि कुटुंबीयांनीही कोणत्या मानसिक तणावाची किंवा वादाची माहिती दिलेली नाही. नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने संपूर्ण सामनगाव हादरले असून, एवढ्या चिमुकलीने असा निर्णय का घेतला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

पेठरोड येथे ४३ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

नाशिक शहरातील पेठरोड परिसरात 43 वर्षीय उत्तम लाजरस तोरण यांनी घरात घरात बेडशीटचा वापर करून पंख्याला गळफास घेतला. घटनेच्या वेळी घरातील इतर सदस्य देखील उपस्थित होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. परंतु जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले. उत्तम हे श्रीराम रो हाउस, पेठरोड येथे पत्नी ललिता तोरण यांच्यासोबत राहत होते. पत्नीने पोलिसांना माहिती दिली. म्हसरूळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून हवालदार सोनवणे तपास करत आहेत.

दोन्ही प्रकरणांचा पोलीस गंभीरतेने तपास करत आहेत. मानसिक तणाव, कौटुंबिक कलह किंवा सामाजिक दबाव अशा कारणांमुळे असे टोकाचे पाऊल उचलले जाते, असे पोलीस अधिकारी सांगतात.

Follow Us
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी.
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम.
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार.
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका.
... म्हणून चर्चा टाळली जातेय; राहुल गांधींचे गंभीर आरोप
... म्हणून चर्चा टाळली जातेय; राहुल गांधींचे गंभीर आरोप.
मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा
मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा.
पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळेना; इस्राईल-इराण युद्धाचा परिणाम
पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळेना; इस्राईल-इराण युद्धाचा परिणाम.