WCL Final: इरफान पठाणचा विनिंग शॉट, फायनलमध्ये इंडियाचा पाकिस्तानवर 5 विकेट्सने विजय

Pakistan Champions vs India Champions Final Match Result And Highlights: पाकिस्तान चॅम्पियन्सने इंडिया चॅम्पियन्सला विजयासाठी 157 धावांचं आव्हान दिलं होतं.

WCL Final: इरफान पठाणचा विनिंग शॉट, फायनलमध्ये इंडियाचा पाकिस्तानवर 5 विकेट्सने विजय
irfan pathan wcl final 2024
| Updated on: Jul 14, 2024 | 1:19 AM

युवराज सिंह याच्या नेतृत्वात इंडियाच्या दिग्गज खेळाडूंनी धमाका केला आहे. इंडिया चॅम्पियन्स टीमने वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लेजेंड्स फायनलमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान चॅम्पियन्सवर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. इंडिया चॅम्पियन्सने या विजयासह ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. पाकिस्तानने इंडियाला विजयासाठी 157 धावांचं आव्हान दिलं होतं. इंडियाने हे आव्हान 19.1 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. तसेच इंडियाने या विजयासह पाकिस्तान विरुद्धच्या साखळी फेरीतील पराभवाचा वचपाही काढला.

इंडियाकडून अंबाती रायुडू याने 30 बॉलमध्ये 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. रॉबिन उथप्पा याने 10 धावा केल्या. सुरेश रैना 4 रन्स करुन माघारी परतला. गुरुकीरत मान याने 34 धावांचं योगदान दिलं. यूसुफ पठाण याने 16 बॉलमध्ये 30 रन्स करत इंडियाला विजयाजवळ आणून ठेवलं. तर अखेरीस कॅप्टन युवराज सिंह आणि इरफान पठाण या दोघांनी इंडियाला विजयी केलं. इरफानने विनिंग शॉट मारला. युवराजने 15 आणि इरफानने 5 धावा केल्या. पाकिस्तानकडून आमीरन यामीन याने 2 विकेट्स घेतल्या. तर सइद अजमल, वाहिब रियाझ आणि शोएब मलिक या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

पाकिस्तानची बॅटिंग

दरम्यान त्याआधी पाकिस्तानने टॉस जिंकून 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 156 धावा केल्या. पाकिस्तानसाठी शोएब मलिक याने 41 धावांची खेळी केली. कामरान अकमल 24, मकसूद 21, मिस्बाह उल हक 18, सोहेल तन्वीर 19* आणि शर्जील खानने 12 धावा केल्या. तर इतरांना काही करता आलं नाही. इंडियाकडून अनुरीत सिंह याने 3 विकेट्स घेतल्या. तर आर विनय कुमार, नेगी आणि इरफान पठाण या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

इंडियाचा विजय

पाकिस्तान चॅम्पियन प्लेइंग ईलेव्हन: युनूस खान (कॅप्टन), कामरान अकमल (विकेटकीपर), शर्जील खान, सोहेब मकसूद, शोएब मलिक, शाहिद आफ्रिदी, मिसबाह-उल-हक, आमेर यामीन, सोहेल तन्वीर, वहाब रियाझ आणि सोहेल खान.

इंडिया चॅम्पियन्स प्लेइंग ईलेव्हन: युवराज सिंग (कर्णधार), रॉबिन उथप्पा (विकेटकीपर), अंबाती रायुडू, सुरेश रैना, युसूफ पठाण, इरफान पठाण, पवन नेगी, विनय कुमार, हरभजन सिंग, राहुल शुक्ला आणि अनुरीत सिंग.